ETV Bharat / bharat

पुलवामा हल्ला : विरोधी पक्ष सरकारसोबत उभे राहतील, सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय - CRPF

सर्वपक्षीय बैठकीला महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत उपस्थित होते.

सर्वपक्षीय बैठक
author img

By

Published : Feb 16, 2019, 3:34 PM IST

नवी दिल्ली - पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीफचे ४५ जवान धारातिर्थी पडले. यासंबंधी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी सर्व नेत्यांनी या प्रसंगात सरकारसोबत उभे राहण्याचे आश्वासन दिले.

संसदीय कार्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले, की बैठकीत सर्व नेत्यांमध्ये पुलवामा घटनेवर चर्चा झाली. सैनिक आणि अर्ध सैनिकांना पूर्ण मोकळीक आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे गृहमंत्री या बैठकीत म्हणाले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारला या प्रसंगात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

सर्व पक्षांना पुलवामा हल्ल्यासंबंधी सर्व माहिती दिली जाईल. तसेच, यानंतर सरकारने कोण कोणती पावले उचलली त्याची माहिती दिली जाईल असे, गृहमंत्र्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या बैठकीच्या सुरुवातीला सर्व नेत्यांनी दोन मिनीटे मौन धारण केले.

पुलवामामध्ये झालेल्या या हल्ल्यात ४५ जवान हुतात्मा झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्याची भारत सरकारने कठोर शब्दात निंदा केली आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांना याची किंमत चुकवावी लागेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Intro:Body:

पुलवामा हल्ला : विरोधी पक्ष सरकारसोबत उभे राहतील, सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.