ETV Bharat / bharat

देशातील विविध एम्स रुग्णालयातील अनेक पदे रिक्त; राज्यसभेत चर्चा - एम्स

अनेक संस्थांमध्ये डॉक्टरांसह अनेक पदे रिक्त आहेत. यासोबत या संस्थांमध्ये विविध विभाग सुरू करण्याचीही गरज आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
author img

By

Published : Jul 4, 2019, 7:08 PM IST

नवी दिल्ली - देशातील विविध एम्स रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. याबरोबरच गरीबांना आरक्षण, कोलकात्यातील परिवहन व्यवस्था या मुद्यांवर खासदारांनी शून्य प्रहारात चर्चा केली.

भाजप खासदार प्रभात झा यांनी शून्य प्रहारात मुद्दा उपस्थित करताना म्हटले की, दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेवरील (एम्स) भार कमी करण्यासाठी देशातील इतर ठिकाणी एम्स संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एम्सवरती नागरिकांचा विश्वास आहे. परंतु, नवीव एम्स संस्थांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. अनेक संस्थांमध्ये डॉक्टरांसह अनेक पदे रिक्त आहेत. यासोबत या संस्थांमध्ये विविध विभाग सुरू करण्याचीही गरज आहे.

भाजप खासदार अशोक वाजपेयी यांनी आर्थिक मुद्यावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाबाबत चर्चा केली. कलम १२४ उल्लेख करताना वाजपेयी म्हणाले, विविध संस्थांमध्ये आरक्षणानुसार प्रवेश प्रकिया सुरू आहे. परंतु, अनेक शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणानुसार प्रवेश प्रकिया सुरू झाली नाही, अशा संस्थांमध्येही उत्पन्नानुसार आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.

भाजप खासदार महेश पोतदार यांनी कोलकातातील प्रचलित परिवहन व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. कोलकातातील रिक्षांमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर बसतो. पोतदार यांनी असली प्रथा बंद झाली पाहिजे, यावर जोर दिला. ही रिक्षा व्यवस्था बंद करुन त्यांना उपजीविकेची नवीन संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.