ETV Bharat / bharat

देशातील सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस; भाजप नेत्याचा दावा - भाजप देश कोरोना लस

ओडिशाचे अन्न पुरवठा मंत्री आर. पी. स्वैन यांनी सारंगी आणि धर्मेंद्र प्रधान या ओडिशाच्या दोन केंद्रीय मंत्र्यांना कोरोना लसीबाबत प्रश्न विचारले होते. त्याला उत्तर देताना प्रताप सारंगी यांनी देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटले. देशातील प्रत्येक नागरिकाच्या लसीकरणासाठी प्रत्येकी सुमारे ५०० रुपये खर्च येईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला...

All citizens in the country to get free COVID-19 vaccine: Sarangi
देशातील सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस; भाजप नेत्याचा दावा
author img

By

Published : Oct 26, 2020, 8:40 AM IST

Updated : Oct 26, 2020, 2:16 PM IST

भुवनेश्वर : बिहार निवडणुकांसाठी भाजपने प्रसिद्ध केलेल्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे. यावरुन देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. बिहारमध्ये निवडणुका असल्यामुळे केवळ बिहारवर ही कृपा दाखवत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्यामुळे आता भाजपचे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी केवळ बिहारच नाही, तर देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

प्रत्येकी ५०० रुपये खर्च..

ओडिशाचे अन्न पुरवठा मंत्री आर. पी. स्वैन यांनी सारंगी आणि धर्मेंद्र प्रधान या ओडिशाच्या दोन केंद्रीय मंत्र्यांना कोरोना लसीबाबत प्रश्न विचारले होते. त्याला उत्तर देताना प्रताप सारंगी यांनी देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटले. देशातील प्रत्येक नागरिकाच्या लसीकरणासाठी प्रत्येकी सुमारे ५०० रुपये खर्च येईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आसाम आणि पद्दुचेरीच्या सरकारांनी यापूर्वीच आपापल्या राज्यांमध्ये मोफत कोरोना लस देणार असल्याची घोणषा केली आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची मागणी केली आहे.

सामनातून करण्यात आली होती टीका..

भाजपाने सत्तेत आल्यास कोरोना लसीचे मोफत डोस देण्याचे जे आश्वासन दिले आहे त्यावरून शिवसेनेने टीका केली होती. “बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारी घोषणापत्रात यावा, हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची व राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे,” असं म्हणत शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला होता.

हेही वाचा : कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला ओडिशामध्ये सुरुवात

कोव्हीशिल्ड लसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोरोना विरोधातील "कोव्हीशिल्ड" लसीची चाचणी मुंबईत केईम आणि नायर रुग्णालयात केली जात आहे. या लसीचा अद्याप दुष्परिणाम दिसून आला नसल्याने लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

अमेरिकेतही मोफत कोरोना लस

जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून याचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. यातच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. मी निवडून आल्यास सर्व अमेरिकन नागरिकांना कोरोना लस मोफत देईल, असे जो बायडेन यांनी आश्वासन दिले आहे.

कोरोनावरील लस तामिळनाडूच्या नागरिकांना मोफत

कोरोना विषाणू विरोधातील लस तयार झाल्यानंतर राज्यातील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येईल, अशी घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेही बिहारमध्ये सत्तेत आल्यावर सर्वांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आता तामिळनाडू राज्याने लस मोफत देण्याची घोषणा केली आहे.

Last Updated : Oct 26, 2020, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.