ETV Bharat / bharat

हाथरस प्रकरण : पीडितेवर बलात्कार झाल्याचे अलीगढ रुग्णालयाच्या अहवालात उघड - Aligarh Medical college report Hathras

यापूर्वी मिळालेल्या फॉरेन्सिक अहवालामध्ये असे म्हणण्यात आले होते की, या तरुणीवर बलात्कार झाला नव्हता. यानंतर, उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पीडितेच्या मृत्यूचे कारण हे मानेला झालेली जखम असल्याचे सांगितले होते. मात्र, या नव्या अहवालात 'पेनाईल पेनिट्रेशन' झाल्याचे उघड झाले आहे...

Aligarh hospital report indicates Hathras victim was indeed raped
हाथरस प्रकरण : पीडितेवर बलात्कार झाल्याचे अलीगढ रुग्णालयाच्या अहवालात उघड; पोलिसांचा दावा ठरला खोटा
author img

By

Published : Oct 5, 2020, 12:57 PM IST

लखनौ : हाथरसमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या तरुणीवर बलात्कार झालाच नव्हता, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली होती. मात्र, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाने याप्रकरणी आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात पीडितेवर बलात्कार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष हामझा मलिक यांनी याबाबत माहिती दिली.

यापूर्वी मिळालेल्या फॉरेन्सिक अहवालामध्ये असे म्हणण्यात आले होते, की या तरुणीवर बलात्कार झाला नव्हता. यानंतर, उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पीडितेच्या मृत्यूचे कारण हे मानेला झालेली जखम असल्याचे सांगितले होते. मात्र, अलीगढ रुग्णालयाच्या अहवालात 'पेनाईल पेनिट्रेशन' झाल्याचे समोर आले आहे.

Aligarh hospital report indicates Hathras victim was indeed raped
अलीगढ रुग्णालयाचा अहवाल

हामझा म्हणाले, की २५ तारखेला केलेल्या परीक्षणामध्ये शुक्राणू न आढळल्यामुळे कुमार यांनी बलात्कार झाला नसल्याचे म्हटले होते. मात्र, हा देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. कदाचित कुमार यांना बलात्काराची व्याख्या, किंवा बलात्काराबाबतच काही माहीत नसावे. कारण, देशातील न्यायालयांनी वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की, केवळ शुक्राणू आढळले नाहीत म्हणजे बलात्कार झालाच नाही, असे नसते.

दुसरी गोष्ट म्हणजे, १४ तारखेला या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर २५ तारखेला तिचे परीक्षण करण्यात आले. मात्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, घटनेनंतर ९६ तासांच्या आत परीक्षण केले, तरच शुक्राणू आढळून येण्याची शक्यता असते. या पीडितेचे नमुने तब्बल ११ दिवसांनी तपासण्यात आले, त्यामुळे याठिकाणी शुक्राणू आढळणे केवळ अशक्य आहे, असेही हामझा म्हणाले.

पीडितेवर बलात्कार झाल्याचे अलीगढ रुग्णालयाच्या अहवालात उघड; पोलिसांचा दावा ठरला खोटा

हाथरस येथील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, त्यांच्यासह ४०० लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाथरसमध्ये पोलिसांनी १४४ आणि १८८ कलम लागू केले आहे, त्याचे उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : हाथरसचे बलात्कारी नटीबाईचे भाईबंद आहेत का? शिवसेनेची कंगनावर अप्रत्यक्ष टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.