थ्रिसूर - कल्पना करा कधी नळातून पाण्याऐवजी दारू आली तर? होय, केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यातील सोलमन एवेन्यू सोसायटीमध्ये असाच प्रकार घडला. येथील घरांतील नळातून पाणी येण्याऐवजी चक्क दारू आल्याची घटना घडली. शहरातील सोलोमन्स अॅव्हेन्यू फ्लॅट येथे राहणाऱ्या १८ कुटुंबीयांच्या घरांमधील नळांमधून पाण्याऐवजी दारू आली आहे.
महसूल खात्याने 6 वर्षांपूर्वी दारूचा बेकायदेशीर साठा एका बारमधून जप्त केला होता. न्यायालयाने या दारूची विल्हेवाट लावण्याचा आदेश दिला. त्यानुसार महसूल विभागाच्या आधिकाऱ्यांनी हा साठा बारच्या परिसरामध्ये खड्डा खोदून तिथेच बाटल्या खोलून दारू ओतून दिली. मात्र, ही दारू पाण्याच्या स्त्रोत असलेल्या जलाशयामध्ये मिसळली. याच जलाशयामधून सोसायटीमधील लोकांना पाण्याचा पुरवठा होत असल्याने ही दारू घरांतील नळापर्यंत पोहोचली.
महसूल विभागाच्या कारवाईमुळे घरांमध्ये पाण्याऐवजी दारू येऊ लागल्याचे समोर आल्यानंतर जलाशय स्वच्छ करण्याचा आदेश उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा - '... तर पाकिस्तानी नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू'