रांची - झारखंड पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अल कायदा या संघटनेचा दहशतवादी मोहम्मद कालिमुद्दीन मुजाहिरी याला अटक केली आहे. कालिमुद्दीन हा अल कायदाचा एक मुख्य दहशतवादी आहे. त्याला टाटानगर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे.
कालिमुद्दीनवर भारतासह उपखंडातील तरुणांना जिहादसाठी तयार करणे आणि हिंसेसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. होते. तो नव्याने प्रवृत्त केलेल्या तरूणांना पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठवत होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक एम.एल. मीना यांनी रविवारी पत्रकारांना दिली. मशेदपूर येथील रहिवासी असलेला कलिमुद्दीन हे गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरोधात जमशेदपूर येथे भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा - काश्मीर खरंच शांत आहे का? स्थानिक पत्रकार सांगत आहेत 'ग्राउंड रिअॅलिटी'..!
त्याचे सहकारी मोहम्मद अब्दुल रहमान अली उर्फ हैदर उर्फ कातकी, अब्दुल सामी उर्फ उज्जैर उर्फ हसन दिल्लीच्या तिहाड तुरूंगात आहेत. मीना यांनी सांगितले की, कालिमुद्दीन उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगालसह इतर राज्यांत तरुणांना संघटनेत भरती करून करण्यासाठी फिरत होता. तसेच त्याने बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, सौदी अरबसह इतर देशांमध्येदेखील प्रवास केला आहे.