लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार, हा तिढा शेवटी सुटला आहे. अखिलेश यावेळी आजमगड येथून निवडणूक लढवतील. मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचे वडील मुलायम सिंह यादव यांनी येथूनच विजय मिळवला होता. समाजवादी पक्षाने आज आपल्या स्टार प्रचारकांचीही यादी जाहीर केली आहे.
अखिलेश यादवांसोबत पक्षातील वरिष्ठ नेते आजम खान रामपूर मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. समाजवादी पक्षाने आज २ नावांची यादी जाहीर केली. त्यामध्ये अखिलेश यादव आणि माजी मंत्री आजम खान यांचे नाव होते. यापूर्वी अखिलेश यादवांनी आजमगड येथून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. मात्र, आज अधिकृतपणे ते जाहीर झाले आहे.
- — Samajwadi Party (@samajwadiparty) March 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Samajwadi Party (@samajwadiparty) March 24, 2019
">— Samajwadi Party (@samajwadiparty) March 24, 2019
समाजवादी पक्षाने ४० स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. त्यामध्ये अखिलेश यादवसह त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तर अभिनेत्री जया बच्चन यांच्यावर प्रचाराची विशेष कमान सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पक्षाचे आधारस्तंभ मुलायम सिंह यादव यांचे नाव यादीतून गायब आहे.
आजमगड मुस्लीम बहुल क्षेत्र असून अखिलेश यादव यांना आपले गड वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. भाजप आपली संपूर्ण शक्ती लावून ही जागा जिंकण्याचा प्रयत्न केरेल. तर, काँग्रेस येथे आपला जनाधार परत घेण्याचा प्रयत्न करणार आहे.