नवी दिल्ली - निजामुद्दीनमधील मरकज रिकामे करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पोलिसांकडून कित्येक वेळा नोटीस देऊनही मरकज खाली न केल्याने स्व:त अजित डोवाल यांनी 28 मार्चला रात्री 2 वाजता घटनास्थळी भेट दिली होती. त्यांनी मौलाना साद यांच्याशी चर्चा करून मरकज खाली करायला लावले.
13 ते 15 मार्चच्या दरम्यान मरकजमध्ये 3 हजाराहून अधिक लोक एकत्र जमवण्यात आले होते. यावेळी येथे 200 च्या वर लोकांना जमण्यास परवानगी नव्हती. 23 मार्चला निजामुद्दीन पोलीस ठाण्याचे अधिकारी मुकेश वालिया यांच्याकडून मरकजच्या व्यवस्थापकीय लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून नोटीस देण्यात आली होती. ही जागा तत्काळ रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या आदेशा दुर्लक्ष करून जागा खाली करण्यात आली नाही. याबाबतची माहिती गृहमंत्रालयापर्यंत पोहचवण्यात आली होती.
त्यामुळे ही जागा खाली करण्यासाठी स्वत: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल दाखल झाले. त्यांनी 28 मार्चला रात्री 2 वाजता घटनास्थळी भेट दिली होती. मौलाना साद यांच्याशी चर्चा करून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असल्याची माहिची दिली. येथून लोकांना बाहेर काढणे खूप महत्त्वाचे असून या रोगाचा लागण झाल्यास अनेकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे, असे सांगितले. त्यानंतर लोकांना तेथून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.