कोझीकोड – सोन्याचे प्रमाण वाढत असताना तस्करीचेही प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. हवाई दक्षता पथकाने (एआययू) कोझीकोड येथून 24 कॅरेटचे 1.69 किलो सोने प्रवाशाकडून जप्त केले आहे. या सोन्याची एकूण किंमत 86.69 लाख रुपये आहे.
कोझीकोड विमानतळावरून एका प्रवाशाकडून 86.69 लाखांचे सोने हवाई दक्षता पथकाने जप्त केले. हा प्रवासी सौदी अरेबियामधील रियाधवरून आलेल्या विमानाने कोझीकोड विमानतळावर 23 ऑगस्टला उतरला होता. ही माहिती कोची येथील सीमा शुल्काच्या (प्रतिबंधात्मक) आयुक्त कार्यालयाने दिली आहे. हे सोने प्रवाशाने बॅटरीमध्ये लपवून आणले होते.
काही दिवसांपूर्वीच हवाई दक्षता पथकाने शारजाहमधून आलेल्या प्रवाशांकडून 657 ग्रॅमचे सोने कन्नरूमधून जप्त केले होते. या सोन्याची किंमत 30.55 लाख रुपये आहे.
दरम्यान, अरब राष्ट्रात सोन्याचे मूल्य भारताहून कमी असल्याने अनेकदा आयात शुल्क चुकवून तस्करी करण्यात येते. असे तस्करीचे प्रमाण थांबविण्यासाठी हवाई दक्षता पथकाकडून कारवाई करण्यात येते.