ETV Bharat / bharat

प्रमुख दक्षिण भारतीय शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारली; मात्र, डब्ल्यूएचओ मानकांनुसार प्रदूषितच - Greenpeace India News

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ताज्या आकडेवारीतून असे दिसून आले आहे की, नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत दक्षिणेकडील तीन प्रमुख शहरे बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईमधील यंदाची हवेची गुणवत्ता तुलनात्मकदृष्ट्या चांगली आहे. मात्र असे असले तरी, तिन्ही शहरांमधील हवेची गुणवत्ता अद्यापही डब्ल्यूएचओच्या मापदंडांपेक्षा खराबच आहे. सध्याची स्थितीही हवेतील अपायकारक घटकांचे (प्रदूषकांचे) प्रमाण जास्तच असल्याचे दर्शवते.

हवा प्रदूषण न्यूज
हवा प्रदूषण न्यूज
author img

By

Published : Dec 11, 2020, 5:27 PM IST

बंगळुरू - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ताज्या आकडेवारीतून असे दिसून आले आहे की, नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत दक्षिणेकडील तीन प्रमुख शहरे बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईमधील यंदाची हवेची गुणवत्ता तुलनात्मकदृष्ट्या चांगली आहे. PM2.5 उत्सर्जन (प्रदूषकांच्या कणांचे उत्सर्जन) 16 ते 37 टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. मात्र असे असले तरी, तिन्ही शहरांमधील हवेची गुणवत्ता अद्यापही डब्ल्यूएचओच्या मापदंडांपेक्षा खराबच आहे. सध्याची स्थितीही हवेतील अपायकारक घटकांचे (प्रदूषकांचे) प्रमाण जास्तच असल्याचे दर्शवते.

बंगळुरूमध्ये, यंदाच्या नोव्हेंबरमधील PM2.5ची सरासरी घनता 33.49μg/m3 होती. ती नोव्हेंबर 2019 मध्ये 40.33μg/m3 होती. सध्या आधीच्या तुलनेत PM2.5 च्या सरासरी घनतेमध्ये 16.96% घट झाली. बापूजी नगर आणि जयनगर अनुक्रमे 42μg/m3 आणि 39μg/m3 अशा सरासरी PM2.5 च्या घनतेसह हॉटस्पॉट्स राहिले. विश्लेषकांच्या मते, नोव्हेंबर 2020 मध्ये बंगळुरूमध्ये असे फक्त 12 दिवस असे होते जेव्हा PM2.5 घनता डब्ल्यूएचओच्या मानकांनुसार राहिली. शहरातील बीटीएम लेआउट हे सर्वात कमी प्रदूषित क्षेत्र होते. येथे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण (PM2.5) सरासरी 20μg/m3 राहिले होते.

त्याचप्रमाणे, हैदराबादमध्ये PM2.5 च्या सरासरी घनतेमध्ये 17.88 % घट झाली. या नोव्हेंबरमध्ये PM2.5 ची सरासरी घनता 56.32μg/m3 होती, जी मागील वर्षी याच कालावधीत 68.58μg/m3 होती. सनतनगर व प्राणिसंग्रहालयात हवेच्या गुणवत्तेची म्हणजेच PM2.5 ची सर्वाधिक 62μg/m3 सरासरी नोंद झाली. संपूर्ण महिन्यात, हैदराबादमध्ये केवळ एकच दिवस असा नोंदवला गेला, जेव्हा शहराच्या हवा गुणवत्ता विहित PM2.5 डब्ल्यूएचओ मानकांशी जुळली.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय पर्वत दिन : जाणून घ्या साजरा करण्याची कारणे व यावर्षीची थीम

हैदराबाद आणि बंगळुरूपेक्षा चेन्नईची हवेची गुणवत्ता चांगली आहे. चेन्नईच्या PM2.5 ची सरासरी घनता नोव्हेंबर 2019 मधील 54.75μg/m3 च्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये 34.11μg/m3 होती. सरासरी 48μg/m3 सह मनाली हे चेन्नईमधील सर्वात प्रदूषित क्षेत्र ठरले. आयक्यूएअर एअर व्हिज्युअल आणि ग्रीनपीस आग्नेय आशियाने विकसित केलेल्या ऑनलाइन टूलनुसार PM2.5 मुळे होणारे वायू प्रदूषण आणि No2 यांच्यामुळे 1 जानेवारी ते 4 सप्टेंबर 2020 दरम्यान बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई येथे अनुक्रमे 7577, 6228 आणि 6374 अकाली मृत्यू झाले.

ग्रीनपीस इंडियाच्या विश्लेषक हवामान अभियानाच्या निष्कर्षावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अविनाश चंचल म्हणाले, 'उद्योगांव्यतिरिक्त वाहनांमुळे होणारे प्रदूषण या शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत. शहरांलगतच्या भागात आर्थिक क्रियाकलापांच्या वाढीसह शहर, क्षेत्र आणि लोकसंख्येचा विस्तारामुळे वाहनांच्या खरेदीचेदर वाढले आहेत. 'कमी किमतीत शहरी वाहतुकीचे डिझाईन पुन्हा तयार केले जावे आणि कार्बन-तटस्थ वाहने आणि हवामानातील संवेदनक्षम पायाभूत सुविधा विकसित करण्याची गरज आहे,' या बाबीवर चंचल यांनी भर दिला.

PM 2.5 हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, श्वसनसंस्थेचे विकार आणि फुप्फुसांचा कर्करोग यांचा धोका वाढला आहे. वायू प्रदूषणाला पोषक स्थिती असल्यामुळे विषाणूजन्य संसर्गांचे संक्रमण आणि तीव्रता अशा दोन्हींचीही शक्यता वाढली आहे.

हेही वाचा - उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये अयोध्या राम मंदिर आणि दीपोत्सव पंरपरेची झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.