ETV Bharat / bharat

दमटपणामुळे दिल्लीतील हवेचा स्तर पुन्हा खालावला, प्रदूषण कमी होण्यास पहावी लागणार वाट

author img

By

Published : Nov 8, 2019, 1:35 PM IST

राजधानी दिल्लीमधील हवेचा स्तर पुन्हा एकदा खालावला आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे हवेतील दमटपणा वाढल्याचा परिणाम हवेचा स्तर घसरण्यास कारणीभूत ठरला.

दिल्लीतील हवेचा स्तर पुन्हा घसरला

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमधील हवेचा स्तर पुन्हा एकदा खालावला आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे हवेतील दमटपणा वाढल्याचा परिणाम हवेचा स्तर घसरण्यास कारणीभूत ठरला. मागील तीन दिवसांपासून पडलेल्या ऊन आणि वाऱ्यामुळे हवेचा स्तर सुधारला होता. मात्र, गुरुवारी दमटपणा वाढल्यानंतर पुन्हा एकदा हवेचा स्तर खालावला.

sfds
दिल्लीतील हवेचा स्तर पुन्हा घसरला
पाऊस आणि मंद वाऱ्यामुळे हवामानातील दमटपणा वाढून प्रदुषके आणखी पसरल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
sdfs
दिल्लीतील हवेचा स्तर पुन्हा घसरला
सल्फर-डायऑक्साइड आणि नाइट्रोजन डायऑक्साइडसारख्या घटकांबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर द्वितीय प्रदुषके तयार होतात. द्वितीय प्रदुषकांमध्ये सल्फेटस्, नाईट्रेट्स्, ओझोन आणि एरोसोल सारखे वायू येतात.
sdfs
दिल्लीतील हवेचा स्तर पुन्हा घसरला
मंगळवारी दिल्लीतील हवेचा स्तर ३०९ निर्देशांक होता. मात्र, बुधवारी रात्री त्यामध्ये वाढ होत तो ३४२ अंकावर पोहचला. नोयडा(३६६) गाझियाबाद(३६५) ग्रेटर नोयडा(३५२), फरिदाबाद(३४२) येथील हवेच्या स्तरावरही परिणाम झाला. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हलका पाऊस जरी झाला तरी तो नुकसानकारक असतो, त्यामुळे हवेतील द्वितीय प्रदुषकांमध्ये वाढ होते असे, हवामान विभागाअंतर्गत असलेल्या सफर या विभागाचे प्रमुख गुफरान बेग यांनी सांगितले.
sdf
दिल्लीतील हवेचा स्तर पुन्हा घसरला
हरियाणा आणि पंजाबमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे पिकांचा टाकाऊ भाग जाळल्याचा दिल्लीच्या हवामानावर परिणाम होणार नाही, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नासाच्या उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रामध्येही पंजाब हरियाणा भागामध्ये धुराचे कमी प्रमाण दिसून आले आहे. काश्मीर आणि हिमाचलमध्ये झालेल्या हिमवर्षावामुळे तेथून उत्तर पट्ट्यात थंड हवा येण्याची शक्यता आहे, असे 'स्कायमेट' या खासगी हवामान कंपनीचे शास्त्रज्ञ महेश पालावत यांनी सांगितले. ९ आणि १० नोव्हेंबरपर्यंत हवा २० ते २५ किमी प्रति तास दराने वाहणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला

Intro:Body:

दमटपणामुळे दिल्लीतील हवेचा स्तर पुन्हा खालावला, प्रदुषण कमी होण्यास पहावी लागणार वाट

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमधील हवेचा स्तर पुन्हा एकदा खालावला आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे हवेतील दमटपणा वाढल्याचा परिणाम हवेचा स्तर घसरण्यास कारणीभूत ठरला. मागील तीन दिवसांपासून पडलेल्या ऊन आणि वाऱयामुळे हवेचा स्तर सुधारला होता. मात्र, गुरूवारी दमटपणा वाढल्यानंतर पुन्हा एकदा हवेचा स्तर खालावला.  

पाऊस आणि मंद वाऱ्यामुळे हवामानातील दमटपणा वाढून प्रदुषके आणखी पससल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   

सल्फर-डायऑक्साइड आणि नाइट्रोजन डायऑक्साइडसारख्या घटकांबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर द्वितीय प्रदुषके तयार होतात. द्वितीय प्रदुषकांमध्ये सल्फेटस्, नाईट्रेट्स्, ओझोन आणि एरोसोल सारखे वायू येतात.    

मंगळवारी दिल्लीतील हवेचा स्तर ३०९ निर्देशांक होता. मात्र, बुधवारी रात्री त्यामध्ये वाढ होत तो ३४२ अंकावर पोहचला. नोयडा(३६६) गाझियाबाद(३६५) ग्रेटर नोयडा(३५२), फरिदाबाद(३४२) येथील हवेच्या स्तरावरही परिणाम झाला.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हलका पाऊस जरी झाला तरी तो नुकसानकारक असतो, त्यामुळे हवेतील द्वितीय प्रदुषकांमध्ये वाढ होते असे, हवामान विभागाअंतर्गत असलेल्या सफर या विभागाचे प्रमुख गुफरान बेग यांनी सांगितले.   

हरियाणा आणि पंजाबमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे पिकांचा टाकाऊ भाग जाळल्याचा दिल्लीच्या हवामानावर परिणाम होणार नाही, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नासाच्या उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रामध्येही पंजाब हरियाणा भागामध्ये धुराचे कमी प्रमाण दिसून आले आहे.

काश्मीर आणि हिमाचलमध्ये झालेल्या हिमवर्षावामुळे तेथून उत्तर पट्ट्यात थंड हवा येण्याची शक्यता आहे, असे 'स्कायमेट व्हेदर' या खासगी हवामान कंपनीचे शास्त्रज्ञ महेश पालावत यांनी सांगितले. ९ आणि १० नोव्हेंबरपर्यंत हवा २० ते २५ किमी प्रति तास दराने वाहणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.