ETV Bharat / bharat

चीनमधील ३२४ भारतीयांना घेऊन येणारे विमान दिल्लीत दाखल.. - एअर इंडिया विमान दाखल

चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान काल (शुक्रवार) वुहानला पाठवले होते. हे विमान आज सकाळी ७.३० च्या सुमारास दिल्लीत दाखल झाले.

भारताचे विमान पोहचलं वुहानमध्ये
भारताचे विमान पोहचलं वुहानमध्ये
author img

By

Published : Jan 31, 2020, 9:03 PM IST

Updated : Feb 1, 2020, 8:30 AM IST

नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान काल (शुक्रवार) दिल्लीहून वुहानला गेले होते. यावेळी ३२४ भारतीयांना एअरलिफ्ट करुन हे विमान आज सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाले आहे.

  • Air India special flight carrying 324 Indians that took off from Wuhan (China) lands in Delhi. #Coronavirus

    — ANI (@ANI) February 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

थोड्याच वेळात या सर्व लोकांचे थर्मल स्कॅनिंग करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तसेच डॉक्टरांचे एक विशेष पथक या सर्वांची तपासणी करणार आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास या सर्वांना निरिक्षणाखालीदेखील ठेवण्यात येणार आहे.

गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आणखी ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २५९ जणांचा बळी या विषाणूमुळे गेला आहे. तसेच चीनमध्ये १२ हजार लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : चीनमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान मायदेशी आणणार नाही!

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
Last Updated : Feb 1, 2020, 8:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.