ETV Bharat / bharat

आपली मिग-२१ विमाने ४४ वर्षे जुनी, केवळ अभियंत्यांमुळेच ती वापरण्यायोग्य - हवाईदल प्रमुख - mig 21 news

'आपल्याकडील मिग-२१ एमएफ विमाने जवळजवळ ४४ वर्षे जुनी आहेत. मात्र, आजही आम्ही ती चालवू शकतो, याचे श्रेय त्यांची देखभाल करणाऱ्या अभियंत्यांना जाते. माझी खात्री आहे, इतकी जुनी कारही तुमच्यापैकी कोणी चालवत नसेल,' असे एअर चीफ मार्शल धानोआ यांनी म्हटले आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे.

हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ
author img

By

Published : Aug 22, 2019, 8:59 AM IST

नवी दिल्ली - भारतीय हवाई दल प्रमुख बी. एस. धानोआ यांनी हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-२१ विमाने ४४ वर्षे जुनी असल्याचे सांगून केवळ अभियंत्यांमुळेच ती वापरण्यायोग्य असल्याचे म्हटले आहे. धानोआ यांनी अभियंत्यांचे कौतुक केले असले तरी, बाब अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे. इतक्या जुन्या मोटारीही वापरल्या जात नाहीत. मिग-२१ विमानांच्या वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक वैमानिकांना जीव गमवावा लागला आहे.

'आपल्याकडील मिग-२१ एमएफ विमाने जवळजवळ ४४ वर्षे जुनी आहेत. मात्र, आजही आम्ही ती चालवू शकतो, याचे श्रेय त्यांची देखभाल करणाऱ्या अभियंत्यांना जाते. माझी खात्री आहे, इतकी जुनी कारही तुमच्यापैकी कोणी चालवत नसेल,' असे एअर चीफ मार्शल धानोआ यांनी म्हटले आहे. ते इंडियन एअर फोर्सचे स्वदेशीकरण आणि आधुनिकीकरणासंबंधीच्या परिषदेमध्ये बोलत होते.

'विमानांशिवाय हवाई दल हे शक्तिहीन हवाई दल ठरेल. आपल्याला हवाई दलाचा वापर करण्यासाठी विमानांची गरज आहे ही बाब अत्यंत सामान्य आणि हवाई दलाचा मुख्य आधार आहे. आपण 'गगन शक्ती'सारखा हवाई दलाचा सराव पाहिला आहे. येथे संपूर्ण सरावादरम्यान आम्ही या विमानांची योग्य प्रकारे देखभाल करून त्यांची ८३ टक्के कार्यक्षमता टिकवली आहे, हे आपण पाहिले आहे. तसेच, या विमानांची वाहून नेण्याची क्षमताही ९५ टक्के टिकवली आहे,' असे धानोआ म्हणाले.

'याचबरोबर संरक्षण दलांसाठी स्वदेशी बनावटीची आणि अत्यंत चांगल्या क्षमतेची अत्याधुनिक उपकरणे आवश्यक आहेत. संरक्षणाच्या गरजांसाठी भारताने आयातीवर अवलंबून राहून चालणार नाही. तथापि, अशी शस्त्रास्त्रे तयार होईपर्यंत युद्ध जिंकण्यासाठी ती आयात करावी लागतील. कारण, स्वदेशी बनावटीची संरक्षण शस्त्रास्त्रे तयार होऊन त्यांनी संरक्षण दलांना आवश्यक सर्व गरजा पुरवेपर्यंत वाट पाहणे शक्य नाही. काही प्रमाणात संरक्षण सामग्री आयात करतानाच भारतातच काही सामग्रीची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे भारतात संरक्षण सामग्रीच्या उत्पादनास वेग आला आहे,' असे म्हणत धानोआ यांनी सूचक इशाराही दिला. हे विधान धनोआ यांनी केले, त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांच्या शेजारी बसले होते.

मिग-२१ फायटर विमाने टप्प्याटप्प्याने निवृत्त होत आहेत. मिग-२१ विमानांच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य मोठया प्रमाणात भारतात तयार केले जाते. त्यामुळेच हे विमान अजूनही सेवेत आहे. मिग-२१ च्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या ९५ टक्क्यांपेक्षा जास्त सुट्टयाभागांचे उत्पादन भारतात केले जाते. रशिया आता मिग-२१ विमानांचा वापर करत नाही. १९७३-७४ साली मिग-२१ विमानांचा एअर फोर्समध्ये समावेश झाला. २००६ साली ११० मिग-२१ विमानांचे आधुनिकीकरण करण्यात आले. आत ही विमाने मिग-२१ बायसन म्हणून ओळखली जातात.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.