ETV Bharat / bharat

बडोदा महापालिका निवडणुकीद्वारे एमआयएम करणार गुजरातेत प्रवेश

दक्षिण गुजरातमधून एमआयएम राज्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि प्रवक्ते वारिस पठाण तीन दिवसांच्या दक्षिण गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.

AIMIM
AIMIM
author img

By

Published : Jan 2, 2021, 5:26 PM IST

Updated : Jan 2, 2021, 5:39 PM IST

बडोदा - ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्ष गुजरातेत आपले नशीब आजमावणार आहे. दक्षिण गुजरातमधून एमआयएम राज्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि प्रवक्ते वारिस पठाण तीन दिवसांच्या दक्षिण गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.

तीनदिवसीय दौरा

एमआयएम पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार करीत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बडोदा महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा तीनदिवसीय दौरा असणार आहे. विविध पक्ष कामाला लागले असून एमआएमदेखील यावेळी प्रथमच निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

छोटू वसावा यांच्यासोबत बैठक

पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सभा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण आणि खासदार इम्तियाज जलील त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा करीत आहेत. येथील भारतीय ट्रायबल पार्टीसोबत निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस असून बीटीपीचे नेते छोटू वसावा यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे समजते.

बीटीपीची घोषणा

आगामी बडोदा महापालिकेची निवडणूक एमआयएमसोबत लढविणार असल्याची घोषणा बीटीपीने केली आहे. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांचे जागावाटप आणि त्यासंदर्भातील निवडणुकीसंदर्भातील माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगितली जाणार आहे.

'सर्वच घटकांचा विचार'

बडोदा येथे पोहोचल्यानंतर पठाण म्हणाले, की आतापर्यंत मुस्लिमांचा वापर फक्त रबर स्टॅम्प म्हणून केला जात होता. आता येथे एमआयएम येत आहे. त्यामुळे केवळ मुस्लीमच नाही, तर समाजातील सर्वच घटकांचा विचार करणार आहोत.

Last Updated : Jan 2, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.