नवी दिल्ली : काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांचे समर्थन करणारे आमदार यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस तीन सदस्यीय समिती स्थापन करणार आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत निर्णय घेतला असून, पायलट यांच्या प्रश्नाबाबत लवकरच तोडगा निघणार असल्याचेही वेणुगोपाल यांनी सांगितले.
दरम्यान, पायलट यांनी आज (सोमवार) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे काँग्रेस सूत्रांकडून समजले. या चर्चेमध्ये पायलट यांनी काँग्रेस आणि राजस्थान सरकारच्या हिताचा निर्णय घेतल्याचेही समजत आहे.