गुरुग्राम - ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे माजी सल्लागार अहमद पटेल यांना अतिदक्षता कक्षात (आयसीयू) भरती करण्यात आले आहे. त्यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली असून तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल याने ट्विटरवरून याची माहिती दिली.
- — Faisal Patel (@mfaisalpatel) November 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Faisal Patel (@mfaisalpatel) November 15, 2020
">— Faisal Patel (@mfaisalpatel) November 15, 2020
पटेल यांना १ ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, आता पुढील उपचारासाठी त्यांना आयसीयूत भरती करण्यात आले आहे. फैजल पटेलने ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांना पुढील उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. लवकरात लवकर त्यांची प्रकृती ठीक व्हावी, अशी प्रार्थना करू.