ETV Bharat / bharat

कृषीमंत्र्यांनी लाँच केला 10 हजार कोटींचा आयुष्मान सहकार निधी - Ayushman Sahakar Nidhi news

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सोमवारी सहकारी संस्थांकडून आरोग्य सुविधांसाठीच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एनसीडीसी आयुष्मान सहकार फंड लाँच केला. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ निधी (एनसीडीसी) आरोग्य सेवांना प्रोत्साहन देईल. या योजनेंतर्गत एनसीडीसी सहकारी संस्थांना 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करेल आणि सोसायट्या त्यातून आरोग्य सुविधा स्थापित करतील.

कृषीमंत्र्यांनी लाँच केला10 हजार कोटींचा आयुष्मान सहकार निधी

author img

By

Published : Oct 21, 2020, 8:19 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सोमवारी सहकारी संस्थांकडून आरोग्य सुविधांसाठीच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एनसीडीसी आयुष्मान सहकार फंड लाँच केला. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ निधी (एनसीडीसी) आरोग्य सेवांना प्रोत्साहन देईल.

या योजनेंतर्गत एनसीडीसी सहकारी संस्थांना 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करेल आणि सोसायट्या त्यातून आरोग्य सुविधा स्थापित करतील.

यावर 'कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सहकारी संस्थांकडून मूलभूत आरोग्य सुविधांच्या बांधकामासाठी दहा हजार कोटी रुपयांचा एनसीडीसी आयुष्मान सहकार निधी सुरू केला आहे,' अशी माहिती पीआयबीने ट्वीट करत दिली आहे.

हेही वाचा - सर्व दहशतवादी मदरसामधूनच वाढले; मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्र्यांचे वक्तव्य

याअंतर्गत आधुनिक वैद्यकीय अभ्यासाव्यतिरिक्त आयुष, होमिओपॅथी, औषध निर्मिती, औषध चाचणी, आयुर्वेद मालिश केंद्र व औषध दुकान इत्यादींना प्रोत्साहन दिले जाईल. याशिवाय हा निधी वैद्यकीय शिक्षण संस्थांनाही मदत करेल.

जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या स्टार्ट-अप योजनेंतर्गत कर्जाऊ रक्कम मिळविण्यासाठी सहकारी संस्थेची स्थापना किमान तीन वर्षे आधी झालेली असणे आवश्यक आहे.

एनसीडीसीने केरळमधील सुमारे 30 रुग्णालये आणि देशभरातील एकूण 52 रुग्णालयांना मदत दिली आहे.

हेही वाचा - कुप्रसिद्ध इमारतीचे 22 वर्षांच्या प्रयत्नानंतर प्रार्थनास्थळात रुपांतर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.