ETV Bharat / bharat

एनडीएमध्ये सरकारी बँकांची दुट्टप्पी भूमिका, विजय मल्ल्याचा जळफळाट

किंगफिशर एअरलाईन्सला वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची योग्य दखल घेण्यात आली नाही. उलट ते प्रयत्न प्रत्येक मार्गाने बंद करण्यात आले. किंगफिशर कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक केली होती, असा विजय मल्ल्याने दावा केला आहे.

विजय मल्ल्या
author img

By

Published : Mar 26, 2019, 1:40 PM IST

नवी दिल्ली - जेट एअरवेजला सरकारी बँका मदत करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारी बँकांचे कर्ज बुडवून विदेशात गेलेल्या विजय मल्ल्याने ट्विट करून जळफळाट व्यक्त केला आहे.

  • BJP spokesman eloquently read out my letters to PM Manmohan Singh and alleged that PSU Banks under the UPA Government had wrongly supported Kingfisher Airlines. Media decimated me for writing to the current PM. I wonder what has changed now under the NDA Government.

    — Vijay Mallya (@TheVijayMallya) March 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सरकारी बँका दुट्टप्पी भूमिका घेत असल्याचे ट्विट मल्ल्याने केले आहे. आपण कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक केली होती, असा त्याने दावाही केला आहे. उद्योगपती विजय मल्ल्याने जेट सरकारी बँका आणि एनडीए सरकारच्या धोरणाबाबत टीका करणारे ट्विट केले आहेत. ज्या सरकारी बँकांनी किंगफिशर एअरलाईन्सला योग्य सहानुभूती दाखविली नाही, त्याच बँका जेट एअरवेजला कर्ज देणार आहेत. सरकारी बँका कर्ज देऊन जेट एअरवेजमधील जॉब, संपर्कयंत्रणा आणि कंपनी वाचवित असल्याबद्दल मल्ल्याने आनंदही व्यक्त केला आहे.
  • Happy to see that PSU Banks have bailed out Jet Airways saving jobs, connectivity and enterprise. Only wish the same was done for Kingfisher.

किंगफिशर कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक-

किंगफिशर एअरलाईन्सला वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची योग्य दखल घेण्यात आली नाही. उलट ते प्रयत्न प्रत्येक मार्गाने बंद करण्यात आले. किंगफिशर कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक केली होती, असा त्याने दावा केला आहे.

जेट एअरवेज आणि किंगफिशरला भाजपने दिली वेगवेगळी वागणूक -

जेट एअरवेज आणि किंगफिशरला भाजपने वेगवेगळी वागणूक दिल्याची टीकाही उद्योगपती मल्ल्याने केली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिलेली पत्रे भाजपच्या प्रवक्त्याने वाचून दाखविली आहेत. त्यामध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सरकारी बँका किंगफिशर एअरलाईन्सला मदत करत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

बँकांनी पैसे घेतले नाहीत - मल्ल्या

यापूर्वी विजय मल्ल्याने व्याज वगळून कर्ज फेडण्याची तयारी दर्शविली होती. पुन्हा त्याने ट्विट करत कर्ज फेडण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र बँका आपल्याकडून पैसे घेत नसल्याचा त्याने दावा केला. बँकांनी पैसे घेतले तर जेट एअरवेजला वाचविण्यासाठी मदत होईल, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. विजय मल्ल्यावर एकूण ९ हजार कोटींची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याबाबत इंग्लंडमधील उच्च न्यायालयात खटला सुरू आहे.

Intro:Body:

After Jet Airways bailout Vijay Mallya criticises public sector banks for "double standards"

 Vijay Mallya ,Kingfisher airlines,विजय मल्ल्या, एनडीए, Jet Airways,PSU Banks ,NDA Government,UK High Court

एनडीएमध्ये सरकारी बँकांची दुट्टप्पी भूमिका, विजय मल्ल्याचा जळफळाट

नवी दिल्ली - जेट एअरवेजला सरकारी बँका मदत करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारी बँकांचे कर्ज बुडवून विदेशात गेलेल्या विजय मल्ल्याने ट्विट करून जळफळाट व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये  (एनडीए) सरकारी बँका दुट्टप्पी भूमिका घेत असल्याचे ट्विट मल्ल्याने केले आहे. आपण कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक केली होती, असा त्याने दावाही केला आहे.

उद्योगपती विजय मल्ल्याने जेट सरकारी बँका आणि एनडीए सरकारच्या धोरणाबाबत  टीका करणारे ट्विट केले आहेत. ज्या सरकारी बँकांनी किंगफिशर एअरलाईन्सला योग्य सहानुभूती दाखविली नाही, त्याच बँका जेट एअरवेजला कर्ज देणार आहेत. सरकारी बँका कर्ज देऊन जेट एअरवेजमधील जॉब, संपर्कयंत्रणा आणि कंपनी वाचवित असल्याबद्दल मल्ल्याने आनंदही व्यक्त केला आहे.

किंगफिशर कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक-

किंगफिशर एअरलाईन्सला वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची योग्य दखल घेण्यात आली नाही. उलट ते प्रयत्न प्रत्येक मार्गाने बंद करण्यात आले. किंगफिशर कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक केली होती, असा त्याने दावा केला आहे.

जेट एअरवेज आणि किंगफिशरला भाजपने दिली वेगवेगळी वागणूक -

जेट एअरवेज आणि किंगफिशरला भाजपने वेगवेगळी वागणूक दिल्याची टीकाही उद्योगपती मल्ल्याने केली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिलेली पत्रे भाजपच्या प्रवक्त्याने वाचून दाखविली आहेत. त्यामध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सरकारी बँका किंगफिशर एअरलाईन्सला मदत करत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

बँकांनी पैसे घेतले नाहीत - मल्ल्या

यापूर्वी विजय मल्ल्याने व्याज वगळून कर्ज फेडण्याची तयारी दर्शविली होती. पुन्हा त्याने ट्विट करत कर्ज फेडण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र बँका आपल्याकडून पैसे घेत नसल्याचा त्याने दावा केला. बँकांनी पैसे घेतले तर जेट एअरवेजला वाचविण्यासाठी  मदत होईल, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.

विजय मल्ल्यावर एकूण ९ हजार कोटींची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे.  मल्ल्याचे भारताकडे  प्रत्यार्पण करण्याबाबत इंग्लंडमधील उच्च न्यायालयात खटला सुरू आहे.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.