ETV Bharat / bharat

गुजरात राज्यसभा : तिघांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने उर्वरित आमदारांना रिसॉर्टमध्ये पाठवले

author img

By

Published : Jun 7, 2020, 7:55 AM IST

याआधी काँग्रेसने मार्चमध्ये आपल्या आमदारांना जयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये पाठवले होते. तेव्हा 26 मार्चला प्रस्तावित असलेल्या राज्यसभा निवडणुकांआधी त्यांच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउन लागू झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

गुजरात राज्यसभा : तिघांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने उर्वरित आमदारांना रिसॉर्टमध्ये पाठवले
गुजरात राज्यसभा : तिघांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने उर्वरित आमदारांना रिसॉर्टमध्ये पाठवले

अहमदाबाद - 19 जूनला होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकांपूर्वीच गुजरातमधील काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले. यानंतर काँग्रेस पक्ष सावध झाला असून त्यांनी शनिवारी त्यांच्या अनेक आमदारांना संबंधित विधानसभा मतदारसंघांच्या नजिकच्या रिसॉर्ट आणि बंगल्यांमध्ये हलविले आहे. त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचू नये, यासाठी पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे. पक्षाच्या एका नेत्याने ही माहिती दिली.

काँग्रेसचे अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी तीन जूनला राजीनामे दिले होते. तर, ब्रजेश मेरजा पाच जूनला पक्षातून बाहेर पडले होते. यानंतर 182 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस सदस्यांची संख्या 65 राहिली आहे. दरम्यान, दहा जागा न्यायालयीन प्रकरणे आणि राजीनाम्यांमुळे रिकाम्या असल्याने विधासभेची प्रभावी संख्या सध्या 172 आहे.

काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी यांनी पक्षाच्या उत्तर गुजरातमधील अनेक आमदारांना बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी येथील एका रिसॉर्टमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती दिली. तर, दक्षिण आणि मध्य गुजरातेतील आमदारांना आणंदमध्ये खासगी बंगल्यांमध्ये पाठवले असल्याचे ते म्हणाले. तर, सौराष्ट्रातील आमदारांना राजकोटच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

‘पक्षश्रेष्ठींनी आमदारांना त्यांची कामे पूर्ण करून शनिवारी आणंद, अंबाजी आणि राजकोटमधील रिसॉर्टसमध्ये पोहोचण्यास सांगितले होते. त्यांच्यापैकी बहुतेकजण त्यांच्या विधानसभा मतदारसंघांतील झोनवार स्थितीनुसार रिसॉर्टमध्ये पोहोचत आहेत. अनेकजण या ठिकाणी पोहोचले असून इतरही लवकरच पोहोचतील,’ असे दोशी म्हणाले. पक्षाचे वरिष्ठ नेते आमदारांशी संवाद साधून सध्याची स्थिती आणि आगामी राज्यसभा निवडणुकांवर चर्चा करतील, असे ते म्हणाले. या सर्व आमदारांना गुजरातमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी 19 जूनला होणाऱ्या निवडणुकांच्या दिवसापर्यंत या ठिकाणी ठेवले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले,

याआधी काँग्रेसने मार्चमध्ये आपल्या आमदारांना जयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये पाठवले होते. तेव्हा 26 मार्चला प्रस्तावित असलेल्या राज्यसभा निवडणुकांआधी त्यांच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउन लागू झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

काँग्रेसने वरिष्ठ नेते भरत सिंह सोलंकी आणि शक्तिसिंह गोहिल यांना या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले आहे. मात्र, सदस्यांची संख्या घटून 65 झाल्यानंतर पक्षाला राज्यसभेच्या या दोन जागा जिंकण्यात अडचणी येऊ शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.