ETV Bharat / bharat

आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधींची घेतली भेट - आदित्य ठाकरे बातमी

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज(बुधवारी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रथमच राहुल गांधींची भेट घेतली आहे

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 15, 2020, 12:52 PM IST

नवी दिल्ली - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (बुधवारी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रथमच राहुल गांधींची भेट घेतली आहे, यावेळी त्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांची ही भेट घेतली.

राहुल गांधीची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचे निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण त्यावेळी राहुल गांधी आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती. आदित्य ठाकरेंनी राहुल गांधीची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

काल (मंगळवारी) आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या कार्यालयाला भेट दिली. समाज माध्यमे आणि संपर्क साधनांद्वारे सरकार खुप काही करू शकते, सरकारी योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी तसेच शिक्षण आणि पर्यटन विकास करण्यासाठी समाज माध्यमांद्वारे काय करता येईल यावर आदित्य ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

  • It was truly a pleasure to interact with @Facebook & @instagram at the HQ in Delhi. There’s so much work governments can do through the power of connectivity and social media. Explored a couple of themes for rural outreach of schemes, education and tourism! pic.twitter.com/0XDEEZlJgI

    — Aaditya Thackeray (@AUThackeray) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधींची घेतली भेट

नवी दिल्ली - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज(बुधवारी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रथमच राहुल गांधींची भेट घेतली आहे, यावेळी त्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांची ही भेट घेतली.

राहुल गांधीची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण त्यावेळी राहुल गांधी आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती. आदित्य ठाकरेंनी राहुल गांधीची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

काल आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या कार्यालयाला भेट दिली. समाज माध्यमे आणि संपर्क साधनांमुळे सरकार खुप काही करू शकते, सरकार योजना ग्रामीण भागात पोहचवण्यासाठी तसेच शिक्षण आणि पर्यटन विकास करण्यासाठी समाज माध्यमांद्वारे काय करता येईल यावर आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.