नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ 25 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या दोन नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभेतील काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या भोजन कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांना निमंत्रण दिलेले नाही, ही अचंबित करणारी बाब आहे.