नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार अटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तसेच कोरोनावर शोधण्यासाठी जगभरामधील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. यातच मुथरामधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आपण दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णाला बरे करू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
रामसेवक यादव असे त्यांचे नाव आहे. ते गोविंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. श्री कृष्णांनी स्वप्नात येऊन आपल्याला कोरोना रुग्णांना बरे करण्याचा मार्ग दाखवला. या आजाराने बाधित झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वाचवीन. जर मी रूग्णांना बरे करू शकलो नाही. तर मी कोणत्याही शिक्षेला सामोरे जाण्यास तयार आहे," असे व्हिडिओमध्ये त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. दरम्यान संबधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी, प्राणघातक संसर्गावर उपचार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीला लखनौमधील पोलिसांनी अटक केली होती. अहमद सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने दुकानाबाहेर आपण कोरोनाग्रस्ताला बरे करू शकतो, असा बोर्ड लावला होता. त्यावर पोलिसांनी त्याला अटक केली होती.