ETV Bharat / bharat

कंगनाचा बंगला पाडणं ही भ्याडपणा अन् सूडबुद्धीनं केलेली कारवाई - देवेंद्र फडणवीस - कंगना रणौत बंगला

अवैध बांधकाम असल्याचे म्हणत महापालिकेने कंगना रणौतच्या कार्यालयाचा काही भाग पाडला. सरकारची ही कृती भ्याडपणा आणि सूडाची असल्याचे फडणवीस म्हणाले.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 9, 2020, 9:18 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतच्या पाली हिल परिसरातील मणिकर्णिका कार्यालयावर मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवला आहे. यावरून भाजप नेते आणि विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडी सरकारवर टीका केली आहे. अवैध बांधकाम असल्याचे म्हणत महापालिकेने कंगना राणौतच्या कार्यालयाचा काही भाग पाडला. 'सरकारची ही कृती भ्याडपणा आणि सूडाची' असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'अशा पद्धतीनं विरोधकांना धमकवण्याचा प्रकार पहिल्यांदाच राज्यात घडत आहे. सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांना अशा पद्धतीनं धमकावण्याचा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहे', असे फडणवीस म्हणाले.

कंगनाचा बंगला पाडण ही भ्याडपणा आणि सूडबुद्धीनं केलेली कारवाई

'सरकार पुरस्कृत दहशत पसरवण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. आपल्या विचारांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींविरोधात मग ते पत्रकार असो, किंवा माध्यमातील कर्मचारी असो, त्यांच्या विरोधात दमनकारी नितीचा वापर हे सरकार करत आहे. कोणाचे विचार चुकीचे वाटले, तर त्याला रस्त्यावर आणून मारू, सरकार यास पाठिंबा देईल, हे महाराष्ट्रातच नाही तर देशातही कोठेही घडले नाही. जे चुकीचं आहे, त्याला चुक म्हटलं पाहिजे. अशा गोष्टींमुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांचा जितका अपमान होत आहे, तितकाच अपमान सरकार ज्या पद्धतीनं कारवाई करत आहे, त्यामुळे राज्याचा होत आहे'

'जर अवैध बांधकाम आहे, तर नक्कीच कारवाई व्हायला हवी. मात्र, सर्वांसोबतच अशी कारवाई व्हायला हवी. कोणी जर तुमच्या विरोधात बोललं तर कारवाई करणं हे भ्याडपणा आणि सुडाची भावनेतून केलेलं कृत्य आहे. महाराष्ट्रात अशा भावनेचा सन्मान होऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.