विशाखापट्टनम - महात्मा गांधींपेक्षाही अधिक आत्मविश्वास असलेले अनेक नेते जगाने पाहिलेत. मात्र, लोकांवर त्यांच्याइतका क्रांतीकारक प्रभाव कोणाचाही पडला नसेल. मोहनदास करमचंद गांधी यांनी भारतामध्ये अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या जोरावर क्रांती घडवून आणली. गांधीजींच्या नेतृत्वात भारतीयांनी ब्रिटिशांना लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवले. त्यांच्याकडे सॉक्रेटीसचे शहाणपण, सेंट फ्रान्सिसची नम्रता, बुद्धांची माणुसकी, ऋषीमुनींचे संतत्व आणि लेनिनसारखी लोकप्रियता होती. त्यांनी एका स्वतंत्र्य भारताचे स्वप्न पाहिले, भारताच्या लोकांना ते स्वप्न दाखवले आणि अहिंसेच्या मार्गाने ते सत्यातही उतरवले. त्यांची शिकवण ही भारतालाच नाही, तर जगाला लागू पडत होती. त्यांचे जीवन हाच त्यांचा संदेश होता. त्यांचे उपदेश हे सर्वांना सर्वकाळ लागू पडतील असे होते.
तेव्हाचा संघर्ष आणि आताचा संघर्ष यात फरक आहे. आताचा संघर्ष हा छोट्या पातळीवरील असो किंवा मोठ्या, धोकादायक आहे. आताचा संघर्ष हा हितसंबंधांमधील संघर्ष आहे. हा वैयतक्तिक, जातीय, राजकीय, वंशिक, वर्गीय, प्रांतिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आहे. मतभेदांचे पुढचे स्वरूप हा संघर्ष आहे. संघर्ष असणे सामान्य बाब आहे. संघर्ष होण्याची प्रमुख कारणे श्रेष्ठता, अन्याय, असुरक्षितता आणि अविश्वास आहे. तर, संघर्षांचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे, आताच्या काळात विसरत चाललेला गांधीवाद. अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करणे, किंवा टाळणे आपण विसरलो आहे. आजच्या काळात आपण खरेच हुशार आहोत की मुर्ख हे कळायला मार्ग नाही. शहाणपण आणि मूर्खपणा हे हातात हात घालून सोबत फिरत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास, मुसळधार पावसात छिद्रे असलेली छत्री घेऊन उभा असलेला माणूस म्हणजे आजचा समाज होय.
हेही वाचा : गांधीजींचे संवादकौशल्य आणि संज्ञापनातील गांधीवाद...
विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच जगात हिंसा ही एक पंथ बनली आहे. हिरोशिमा आणि नागासाकीच्या संहाराने शहारुन जाऊन देखील जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करते आहे. १९४७च्या सुरुवातीला आईनस्टाईन म्हणाला होता, तिसऱ्या महायुद्धामध्ये कोणती शस्त्रे वापरली जातील हे मला नाही माहित, मात्र चौथ्या महायुद्धामध्ये नक्कीच दगड आणि काठ्यांचा वापर केला जाईल. आजवर जगात २५० युद्धांमध्ये ५० दशलक्षाहून अधिक लोक मारले गेले आहेत. आणि सध्या जगात ४० पेक्षा जास्त युद्धे सुरु आहेत. शिवाय देशांमधील आंतर्गत युद्धेही वाढली आहेत. आपण हिंसेच्या छायेखाली राहत आहोत हे सांगण्याची गरजही नाही.
जगातील सर्व देशांच्या सैन्यदलासाठीचा एकूण खर्च हजारो कोटी डॉलर्सच्या घरात आहे. अगदी भारताचाही सैन्यावर एकूण खर्च ६६५ कोटी डॉलर्स आहे. भारताच्या सैन्यदलामध्ये १५ लाख सैनिक आहेत. जगभरातील विकसीत देश सुरक्षेच्या नावाखाली विकासासाठी होणाऱ्या खर्चाच्या २० पट अधिक खर्च सैन्यदलावर करतात. एकूण सैन्यावरील खर्चापैकी, ७० टक्के खर्च विकसीत देश करतात; १५ टक्के खर्च हा विकसनशील देश, तर १५ टक्के खर्च इतर देश करतात. जगभरात सगळीकडेच आरोग्य, शिक्षण आणि इतर विकासात्मक कामांसाठी जो खर्च झाला पाहिजे तो सैन्याकडे वळवण्यात येत आहे. जगभरात एकूण १४,००० अणुबॉम्ब अस्तित्वात आहेत. यांपैकी ९० टक्क्यांहून अधिक हे अमेरिका आणि रशियाकडे आहेत. यासोबतच सामान्य नागरिकांकडेही मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आहेत. जगभरातील १०० कोटी बंदूकींपैकी ८५ कोटी बंदुका या सामान्य नागरिकांकडे आहेत.
हेही वाचा : दलितांसाठी गांधीजींनी मिळविलेला विजय
जर आपण सर्वांनी गांधीवादाची कास धरली, तर खरेच या सर्वाची गरज पडेल? गांधीवाद हा मुळातच अहिंसेवर आधारित आहे. गांधीजींच्या दृष्टीने युद्ध अनीतिमान आहे कारण ते अहिंसेच्या तत्त्वाशी आणि धर्माच्या उच्च नियमांशी विरोधी आहे. गांधींनी युद्धाला अल्पसंख्यांकाची निर्मिती करणारे मानले, जे बहुसंख्यांवर त्यांची इच्छा थोपविण्याचा प्रयत्न करतील. परस्पर आणि आंतरराष्ट्रीय सर्व विवाद मिटविण्यासाठी त्यांनी नैतिक मार्ग ठरवून दिला. हिंसेला हिंसेने प्रत्युत्तर दिल्यास हिंसा वाढेल, हिंसेला केवळ अहिंसाच प्रत्युत्तर देता येते असे गांधीजी मानत. गांधींच्या मते, कोणीही कोणाचाही 'शत्रू' नसतो. गांधींनी संघर्षांच्या अहिंसक निराकरणासाठी आणि जागतिक शांततेसाठी लाखो लोकांना एकत्रित करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, शांततेचा अभाव हे सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात तणावाचे कारण आणि परिणाम आहे. शांती ही लोकांना एकत्र आणणारी एक सकारात्मक शक्ती आहे. युद्ध, जी एक विभाजन करणारी शक्ती आहे, जागतिक शांततेच्या प्रगतीसाठी कधीही योगदान देऊ शकत नाही.
त्यांच्या 150 व्या जयंतीच्या वर्धापन दिनानिमित्त, आपण त्यांच्या आदर्शांकडे पुन्हा वाटचाल करूयात. हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.