ETV Bharat / bharat

कर्नाटकमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; बसवेश्वर स्वामींसह चार ठार..! - KArnataka Accident

कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कुंदागोला शिवानंद मठाचे श्री बसवेश्वर स्वामी यांचाही मृत्यू झाला आहे.

Accident in Karnataka on National Highway 1 three died
कर्नाटकमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तीन जागीच ठार, दोन जखमी!
author img

By

Published : Jan 26, 2020, 3:54 PM IST

Updated : Jan 26, 2020, 4:55 PM IST

बंगळुरू - कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात झालेल्या अपघातात कुंदागोला शिवानंद मठाचे श्री बसवेश्वर स्वामी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह या अपघातात चार जण जागीच ठार झाले. यारीकोप्पा गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर हा अपघात झाला.

शिवानंद मठ शाळेमध्ये आज सकाळी प्रजासत्ताक दिन साजरा करून एका भक्ताच्या लग्नासाठी स्वामी धारवाडकडे जात होते. यावेळी महामार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह शंकरगौडा पाटील, महादेव कडेशगौला आणि मारूती कुकुनुरा चिक्कोडी हे तिघे या अपघातात दगावले. पाटील हे कुंदागोला गावचे रहिवासी होते, तर बाकी दोघे काब्बुरा गावचे रहिवासी होते.

या अपघातात बसवराज पुजारा, सिद्धप्पा इंगल्ली आणि सोमलिंग देसाई हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा : प्रजासत्ताक दिनीच आसाममध्ये चार ठिकाणी ग्रेनेड हल्ला

Intro:ಮೂವರು ಸಾವು ಉಳಿದ ಫೋಟೋಗಳುBody:ಮೂವರು ಸಾವು ಉಳಿದ ಫೋಟೋಗಳುConclusion:
Last Updated : Jan 26, 2020, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.