नवी दिल्ली - ईव्हीएममधून मिळणारं प्रत्येक मत भाजपचं, असे भाजपचे उमेदवार बक्षिस सिंह म्हणत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. दरम्यान व्हिडिओ बनावट असल्याचा बक्षिस सिंह यांनी म्हटले आहे.
-
Haryana Chief Electoral Officer,Anurag Agarwal on viral video of BJP candidate Bakshish Singh (in pic 2) in which he allegedly said 'every vote on EVM is for BJP': A show-cause notice was issued to the candidate, he replied saying, 'video was edited'. Matter is being investigated pic.twitter.com/qcmtXxbmIz
— ANI (@ANI) October 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Haryana Chief Electoral Officer,Anurag Agarwal on viral video of BJP candidate Bakshish Singh (in pic 2) in which he allegedly said 'every vote on EVM is for BJP': A show-cause notice was issued to the candidate, he replied saying, 'video was edited'. Matter is being investigated pic.twitter.com/qcmtXxbmIz
— ANI (@ANI) October 21, 2019Haryana Chief Electoral Officer,Anurag Agarwal on viral video of BJP candidate Bakshish Singh (in pic 2) in which he allegedly said 'every vote on EVM is for BJP': A show-cause notice was issued to the candidate, he replied saying, 'video was edited'. Matter is being investigated pic.twitter.com/qcmtXxbmIz
— ANI (@ANI) October 21, 2019
'तुम्ही कुणालाही मतदान करा, मात्र जाईल तर ते भाजपलाच. तुम्ही कुणाला मतदान केले आहे. तेही आम्हाला माहिती होईल. तुम्ही आमच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका. मोदींची आणि मनोहर लाल यांची नजर खुप तीक्ष्ण आहे. तुम्ही मशिनमधील कोणतेही बटन दाबले तरी मत भाजपलाच जाईल, याची आम्ही व्यवस्था केली आहे', असे बक्षिस सिंह म्हणत असल्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
हरियाणा विधानसभेसाठी राज्यभरामध्ये आज (सोमवारी) सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी एकूण १ हजार १६९ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. यामध्ये १ हजार ६४ पुरुष आणि १०५ महिला उभ्या आहेत.