कोरोनाविषाणू (कोविड-१९) ही जगासाठी अत्यंत वाईट बातमी आहे. त्याने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. लाखो लोकांना रूग्णालयात पोहोचवले आणि जागतिक अर्थव्यवस्थांचा विध्वंस केला. या घडामोडींना भारतही अपवाद नाही. तरीसुद्धा, या उलथापालथीमध्ये एक रुपेरी किनार आहे. किमान, भारतीय माध्यमांमध्ये कधी नव्हे आरोग्य विषयावर लक्ष केंद्रीत झाले आहे.
भारतीय माध्यमांतील दिग्गज हे आरोग्य विषयावरील आणि कोणत्याही वर्गातील आरोग्य कामगार मग ते डॉक्टर्स असोत, निमवैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ किंवा अगदी स्वच्छता कामगार असोत, त्यांच्यावरील बातम्यांसाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.
प्रत्येक वर्तमानपत्र आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना स्तंभ समर्पित करत आहे. आकाशवाणीवरी त्यांच्याशी संबधित कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. टीव्ही वाहिन्या आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल स्तुती करणारी विजयगीते प्रसारीत करत आहेत.
भारतात आरोग्य हा विषय कधीही प्राधान्याचा नव्हता. किमान माध्यमांसाठी तर निश्चितच नव्हता. आरोग्यावरील वृत्तांत हे बहुतेक प्रसंगावर आधारित असते. आरोग्य विषयक बातम्यांची जाहिरातीशी स्पर्धा असते आणि जेव्हा एखादी राजकीय बातमी किंवा शहरातील गुन्ह्याची बातमी येते तेव्हा आरोग्यविषयक बातमी ही सर्वात अगोदर बाजूला ढकलली जाते.
जेव्हा एखादे संकट निर्माण होते. तेव्हाच आरोग्य हा विषय माध्यमांमध्ये ठळकपणे मांडलेले दिसतो. संकट याचा अर्थ बळींची संख्या किंवा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे संपूर्ण ढासळणे असाच असतो.
कोविड-१९ च्या अगोदर २००३ मध्ये सार्स, २००५ मध्ये एचवनएनवन, डेंग्यु आणि चिकुनगुनिया या साथीचा उद्रेक झाला होता. या काही आरोग्यविषयक घटना अशा होत्या की, त्यांनी ठळक बातम्यांमध्ये अग्रगण्य स्थान मिळवले होते. तेव्हा आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची भूमिका ही क्वचितच फोकसमध्ये होती. मृत्यू, रोग्यांची संख्या आणि लोकांना सेवा देण्यात अपयशी ठरलेली आरोग्यसेवा याच विषयांवर बातम्या होत्या.
त्यानंतर माध्यमांनी आरोग्यावर लिहिण्यास सुरूवात केली. तेव्हा फक्त जीवनशैलीवर लिहले जात होते. जीवनशैलीमुळे होणारे आजार जसे की, मधुमेह आणि उच्च रक्तदाब आशा विषयावर लिहले जात. तसेच आरोग्यविषयक कार्यक्रम हे बहुतेक खासगी रूग्णालये आणि औषधी कंपन्यांनी प्रायोजित केलेले असत.
भारतात माध्यमांमध्ये आरोग्यविषयक लेखन करणे अवघड आहे. केवळ काही आघाडीवरील वर्तमानपत्रांनी आरोग्यविषयक वार्ताहरांना जागा समर्पित केली आहे. लोकांना आरोग्य विषयक बातम्यामध्ये रस नसतो, असा युक्तीवाद केला जातो. संपादकाला आरोग्यविषयक बातमीसाठी राजी करणे हे खूप अवघड असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विषयक बातमी ऐवजी त्याच जागेत एखादी जाहिरात आली तर ती वेतनासाठी जास्त पैसे मिळवून देते.
आरोग्य कर्मचारी मागण्यांसाठी संपावर जात नाहीत. तोपर्यंत माध्यमांच्या दृष्टिने ते कधीच अस्तित्वात नसतात. आरोग्यसेवा कर्मचारी जेव्हा कर्तव्याच्या बाहेर जाऊन काही चांगले काम करतात तेव्हा बातमी ही नेहमीच केवळ जागा भरून काढण्यासाठी किंवा वृत्तसंपादकाची कृपा म्हणून प्रसिद्ध केली जाते. मात्र, आता आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना देवाचा दर्जा दिला जात आहे.
यापूर्वीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी एचआयव्ही, एड्स, सार्स, एचवनएनवन किंवा क्षयरोग या रोगांशी सामना केला आहे. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल जो आदर आता पाहायला मिळत आहे. तो पूर्वी कधीच नव्हता.
क्षयरोगामुळे भारतात वर्षाला सर्वाधिक मृत्यू होतात. अनेक महिला प्रसुतीदरम्यान बाळाला जन्म देताना मरतात आणि कित्येक जण रस्ते अपघातात मरतात. यावेळी एकही भुवई उंचावली जात नाही. फक्त जागतिक क्षयरोग दिनाच्या दिवशीच क्षय विषयाला माध्यमांमध्ये जागा मिळते.
आतापर्यंत कोणत्याच सरकारला आरोग्य हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याइतका महत्वाचा असा वाटलेला नाही. काही सहजगत्या पावले उचलली गेली आणि नंतर मागेही घेण्यात आली, पण त्यांचा उद्देश्य कधीही जागृती निर्माण करणे हा नव्हता. जर तसे असते, तर लोक कुठेही थुंकले नसते आणि प्रत्येक ठिकाण हे संसर्गाचे मुख्य कारण बनले नसते.
कोरोना संकटात आरोग्यसेवा कर्मचारी देवासारखी सेवा करत असल्याचे म्हटले जात आहे. मग हेच कर्मचारी कोरोना संकटापूर्वीही कार्य करतच नव्हते का असा प्रश्न निर्माण होतो. गेल्या कित्येक वर्षापासून आशा कर्मचारी आरोग्य सेवा करत आहेत.
आरोग्यसेवा, स्वच्छता आणि सुरक्षा रक्षकांबद्दल सध्या अभूतपूर्व कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. या आजारावर कोणतेही औषध नसल्याने आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा व्यवस्था कोसळल्या असल्याने, प्रत्येकच त्यांच्यावर आयुष्याच्या सुरक्षिततेसाठी अवलंबून असल्याचे दिसते. कारण काहीही असले तरीही, कोविड-१९ विरूद्धचे युद्ध जिंकण्यासाठी जग एकत्र आले आहे. या कोरोना अभूतपूर्व आरोग्यविषयक संकटाने समाजाला आरोग्याच्या महत्वाची जाणीव झाली असेल आणि भारतीय माध्यमांमध्ये तो विषय नेहमीच प्राधान्याचा राहिल, अशी आशा करू या.
लेखक - आरती धर