ETV Bharat / bharat

सुरतमध्ये आगीचा थरार, १९ जणांचा होरपळून मृत्यू, जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्याहून उड्या मारल्या - Surat

इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी थेट चौथ्या मजल्याहून उड्या मारल्या. जीव वाचविण्यासाठी उंचाहून उडी मारल्याने काही मृत्युमुखी पडले तर काही गंभीर जखमी झाले आहेत. आतापर्यंत सुमारे १९ जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी घटनास्थळी जाणार असून त्यांनी मृतांना प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.

सुरतमध्ये आगीचा थरार...८ जणांचा होरपळून मृत्यू
author img

By

Published : May 24, 2019, 6:13 PM IST

Updated : May 24, 2019, 7:55 PM IST

सुरत - गुजरातच्या सुरत शहरातील सरथाना परिसरात तक्षशिला नावाच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना आज (शुक्रवार) सायंकाळच्या सुमारास घडली. आगीची तीव्रता प्रचंड असल्याने सुमारे १९ जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. या आगात अनेक विद्यार्थी जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शिकवणीचा वर्ग चालवण्यात येत होता. इमारतीतून बाहेर पडण्याची योग्य व्यवस्था नसल्याने काहींनी थेट इमारतीच्या चौथ्या मजल्याहून उड्या मारल्या. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सुरत शहरातील गर्दीच्या परिसरात असलेल्या तक्षशिला या जुन्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजले नाही. या मजल्यावर शिकवणी वर्ग सुरू असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी तेथे उपस्थित होते. आग लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत इमारतीमधून बाहेर पडता येईल असा योग्य मार्ग नव्हता. त्यामुळे या आगीत १९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सुरतमध्ये आगीचा थरार...८ जणांचा होरपळून मृत्यू, नागरिकांनी दुसऱ्या मजल्यावरून मारल्या उड्या

इमारतीच्या चौथ्या मजल्याहून मारल्या उड्या

इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने अनेकांनी थेट दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. त्यामुळे ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुरतकडे रवाना झाले असून त्यांनी मृतांना प्रत्येकी मदत ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.

मोदींनी व्यक्त केले दुःख

काल झालेल्या मतमोजणीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्त्वात भाजपने हे घवघवीत यश मिळवले आहे. या पार्श्वभूमिवर मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काल कार्यकर्त्यांना संबोधित केले. याच्या दुसऱ्याच दिवशी मोदींच्या गुजरातमध्ये झालेल्या या भयंकर घटनेने भाजपच्या आनंदावर पाणी पडले आहे. याबाबत नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे. केंद्र सरकारकडून गुजरात सरकारला योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

चौथ्या मजल्यावर पोहचू शकले नाही अग्निशमन दलाचे जवान

स्थानिक लोकांनी आरोप केला आहे, की अग्निशमन दलाच्या जवानांकडे आवश्यक उपकरणे नव्हती. चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी उंच शिड्या नव्हत्या. त्यामुळे हे जवान लगेच चौथ्या मजल्यावर जाऊ शकले नाही. जिन्याच्या परिसरात आगीचे सम्राज्य असल्याने वर जाणे शक्य नव्हते. अशा वेळी या शिड्या असणे आवश्यक होते. जवानांना वर जाता न आल्याने शिकवणी वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्याहून उड्या मारल्या. विशेष म्हणजे आगीचे वृत्त समजल्यावर केवळ अर्ध्या ताजात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते.

गुजरातच्या मुख्यामंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेचे उच्च स्थरिय चौकशीचे आदेश दिले आहेत. केवळ एका दिवसात याची चौकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. सुरतमध्ये अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Intro:Body:

surat Fire

Conclusion:
Last Updated : May 24, 2019, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.