गोपालगंज (बिहार) - येथील हरखुआ गावातील धनंजय शर्मा यांचे कुटुंब गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. मात्र, अद्यापही कोणीच त्यांना मदत केली नाही. काहीच पर्याय नसल्याने सातवीतील विद्यार्थ्याने कुटुंबीयांची भूक भागवण्यासाठी मजुरी केली. मात्र, मजुरीतून मिळालेले पैशातून त्याला कर्ज फेडावे लागले.
![a-family-of-gopalganj-hungry-for-four-days](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6929211_pkg.jpg)
गुजरातमध्ये शिवणकाम करणाऱ्या धनंजय शर्माचे कुटुंब उपाशी आहे. हे बघून घरातील मोठा मुलगा कृष्णा शर्मा याने आश्रय शिबीरात काम करून पैसे मिळवले. ईटीव्ही भारतशी बोलताना कृष्णाने सांगितले, की तो सातवीचा विद्यार्थी आहे. वडील गुजरातमध्ये अडकले असून त्यांचे काम बंद आहे. त्यामुळे मजुरी करावी लागत आहे.
ईटीव्ही भारतने केली मदत -
ईटीव्ही भारतच्या टीमला कृष्णाच्या आईने सांगितले, की कुटुंब गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. मात्र, कोणीच मदत केली नाही. कर्ज घेऊन घर चालवत आहोत. त्यामुळे मोठ्या मुलाला मजुरी करावी लागली. त्यातून मिळालेल्या पैशांने कर्ज फेडले. पुन्हा पोटाचा प्रश्न तसाच उभा ठाकला आहे. आजदेखील उपाशी राहावे लागले. दरम्यान, ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने त्यांना आर्थिक मदत केली आणि अत्यावश्यक सामान पुरविले.