नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. राजधानी दिल्लीत एका सरकारी डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सरकारी डॉक्टरला लागण झाल्यानंतर संबंधित रूग्णालय तत्काळ बंद करण्यात आले आहे. याचबरोबर संपूर्ण रूग्णालय सॅनेटाईज करण्यात आले आहे. डॉक्टर दिल्लीतील सरकारी रूग्णालयात कार्यरत होते. डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने सदर रूग्णालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राजधानी दिल्लीला कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. केजरीवाल सरकार वारंवार नियमावली जारी करत आहेत. दिल्लीतील नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन दिल्ली सरकारकडून करण्यात आले आहे.