बंगळुरू - महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक राज्यातदेखील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्हात पुरामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले असून सखल भागातील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पशु-पक्षी, जनावरांना सुद्धा पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे नदीतील मगरी गावांमध्ये शिरत असल्याचे दिसत आहे.
बेळगावातील रायबाग तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. येथील नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मगरी नागरी वस्तीत आल्याचे दिसून आले. एक मगर घराच्या छतावर बसल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पुराच्या वाहत्या पाण्यातून आसरा घेण्यासाठी या मगरीने घराच्या छताचा आधार घेतल्याचे दिसत आहे.
-
#WATCH A crocodile lands on roof of a house in flood-affected Raybag taluk in Belgaum. #Karnataka (11.08.19) pic.twitter.com/wXbRRrx9kF
— ANI (@ANI) August 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH A crocodile lands on roof of a house in flood-affected Raybag taluk in Belgaum. #Karnataka (11.08.19) pic.twitter.com/wXbRRrx9kF
— ANI (@ANI) August 12, 2019#WATCH A crocodile lands on roof of a house in flood-affected Raybag taluk in Belgaum. #Karnataka (11.08.19) pic.twitter.com/wXbRRrx9kF
— ANI (@ANI) August 12, 2019