भोपाल- उत्तर प्रदेशच्या शामली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल कोरोना संशयिताने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे काही लक्षण आढळले असल्याने त्याला रुग्णालयात क्वारंटाईन केले होते. त्याच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. मात्र, त्यातच त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
31 मार्चला त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे लक्षणे आढळल्याने दाखल केले होते. त्याचा वैद्याकीय अहवाल येणे बाकी होते. मात्र, त्याने गुरुवारी आत्महत्या केली आहे. आत्महतेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.