ETV Bharat / bharat

ब्रिटनला मिळाला नवा ब्रेग्झिट करार, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती - युरोपियन युनियन (ईयू) आणि ब्रिटनमध्ये नवा करार

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नवा ब्रेग्झिट करार मिळाल्याची माहिती टि्वट करून दिली आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन
author img

By

Published : Oct 17, 2019, 5:56 PM IST

लंडन - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नवा ब्रेग्झिट करार मिळाल्याची माहिती टि्वट करून दिली आहे. युरोपियन युनियन (ईयू) आणि ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून या करारांवर चर्चा सुरू होती. सध्या सर्व समस्या सुटल्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • We’ve got a great new deal that takes back control — now Parliament should get Brexit done on Saturday so we can move on to other priorities like the cost of living, the NHS, violent crime and our environment #GetBrexitDone #TakeBackControl

    — Boris Johnson (@BorisJohnson) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आम्हाला नवा ब्रेग्झिट करार मिळाला आहे. जो आम्हाला पुन्हा आमची शक्ती परत करेल. शनिवारी संसद या कराराला मंजूरी देईल आणि त्यानंतर आम्ही पुढची प्रकिया पुर्ण करू, असे बोरिस यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. दरम्यान बोरिस यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत हा ब्रेग्झिट करार पुर्ण करणार असे म्हटले होते.

मी युरोपीयन युनियनच्या २७ सदस्यांना पत्र लिहणार असून त्यामध्ये त्यांना ब्रेग्झिट कराराला मंजूरी देण्याचे सांगणार आहे, असे युरोपीयन युनियनचे प्रमुख जॉन जंकर यांनी म्हटले आहे.

बोरिस जॉनसन यांनी ब्रेग्झिट कराराचे वचन दिले होते. सध्या त्यांच्याकडे फक्त करार पुर्ण करण्यासाठी १४ दिवस बाकी आहेत. जर ३१ ऑक्टोबर पर्यंत ब्रेग्झिट करार पुर्ण झाला नाही. तर हे प्रकरण २१ जानेवारी २०२० पर्यंत लांबवले जावू शकते. ब्रेग्झिट करार न झाल्यामुळे थेरेसा मे यांना आपल्या पदाचा राजिनामा द्यावा लागला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.