अनुप्पूर - मध्यप्रदेश राज्यातील कारोंडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने स्वत:च्या पतीची हत्या करून स्वयंपाकघरामध्ये मृतदेह पुरला आणि त्याच ठिकाणी महिनाभर जेवन बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अमरकंटक पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कारोंडी या गावामधील प्रमिला या महिलेने आपला पती महेश बैनेवाल याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर सत्य जगासमोर येऊ नये, यासाठी पतीचा मृतदेह घरातील स्वंयपाकघरामध्ये पुरला. गेल्या 1 महिन्यापासून आरोपी प्रमिला त्याच ठिकाणी स्वयंपाक करत होती.
पोलिसांनी प्रमिलाच्या घराची तपासणी केली असता, घरातून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खोदकाम केल्यानंतर स्वयंपाक घरातील फरशीखाली पोलिसांना मृतदेह सापडला. आपल्याला यामध्ये अडकवलं जात असल्याचे प्रमिलाने म्हटले असून पोलीस याप्रकरणी आधिक तपास करत आहेत.