बंगळूरू - गणेशोत्सव हा संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो . गणेशोत्सव हा पर्यावरणाला हानीकारक ठरणार नाही या हेतूने कर्नाटकातील जेपी नगरमधील सत्य गणपती मंदिरात नारळापासून 30 फूट उंच गणेश मूर्ती तयार केली आहे.
हे ही वाचा - महात्मा गांधी आणि असहकार चळवळ
इको फ्रेंडली गणपतीसाठी तब्बल 9 हजार नारळ आणि 3 हजार कच्चे नारळांचा वापर केला आहे. सत्य गणपती शिर्डी साई ट्रस्ट ऑफ पुट्टेनहल्लीच्या माध्यमातून मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.या संस्थेकडून प्रत्येक वर्षी नव्या प्रकारे गणेश मूर्ती तयार केली जाते. यावर्षी नारळापासून गणेश मूर्ती तयार करण्याचे ठरवण्यात आले. गेल्यावर्षी संस्थेने ऊसापासून 30 फूट उंच मूर्ती तयार केली होती.
हे ही वाचा - ...आणि त्याने प्रवाशाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले, थरार सीसीटीव्हीमध्ये कैद!
आज आपण पर्यावरणाविषयी अधिक सजग झाले पाहिजे. आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे. अगदी काही दिवसांवर येउन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येईल.
हे ही वाचा - मुंबईत पोहोचली भारताची 'लाइफलाइन एक्सप्रेस'