वॉशिंगटन- एका मोठ्या संशोधनात रेमदेसिव्हीर हे औषध कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. आज अमेरिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रेमदेसिव्हीर हे औषध पुरेशा प्रमाणात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संशोधनात १०६३ रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांना रेमदेसिव्हीर औषध देण्यात आले, त्यामुळे रुग्णांचा बरे होण्याचा काळ ३१ टक्क्यांनी घटला. पूर्वी कोरोना रुग्णाला बरे होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागायचा, आता ११ दिवसातच रुग्णांची प्रकृती स्थिर होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर औषध हे मृत्यू दर देखील कमी करत असावे, मात्र आशिक निष्कर्षांवरून हे सिद्ध झालेले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रेमदेसिव्हीर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला कमी करू शकतो, एवढेच या संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, रेमदेसिव्हीरची चाचणी ही आरोग्य दुरुस्तीचे मानक असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त कोरोना विषाणूविरुद्ध इतर दुसरे औषध शोधावे लागेल, असे राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे चिकित्सक डॉ. अँटोनी फॉसी यांनी व्हाईटहाऊसमधून बोलताना सांगितले.
हेही वाचा- लॉकडाऊनमुळे दिल्लीतील लोहारांवर उपासमारीची वेळे, पहा 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट