एर्नाकुलम - जिल्ह्यातील कोथामंगलम येथील रहिवासी भागात तब्बल 12 फूट लांबीचा ‘किंग कोब्रा’ या प्रजातीचा साप अढळला आहे. सर्पमित्र मार्टीन मेक्कामाली यांनी हा कोब्रा पकडून वनविभागाकडे दिला आहे.
केरळमध्ये महापूर आला होता. पूरस्थिती ओसरल्यानंतर पुरग्रस्त भागात साप आढळत आहेत. तब्बल सात तास शोधल्यानंतर किंग कोब्रा सापडला. महापूरनंतर हा पाचवा किंग कोब्रा पकडण्यात आला आहे.
गेल्या 100 वर्षांतील सर्वांत भीषण आपत्ती ठरलेल्या या महापुरात हजारो लोक पुरात अडकून पडले होते. यातील सर्वात मोठी गंभीर समस्या म्हणजे पुरात वाहून आलेले विषारी साप ही आहे. सांपाना पकडण्यात सर्पमित्रांना यश येत असले तरी,परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.