इंफाळ - मणिपूरमध्ये बुधवारी लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी तब्बल ९७६ जणांना ताब्यात घेण्यात आले. यासोबतच ८६६ वाहनेही जप्त करण्यात आली. यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांपासून, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या लोकांचा समावेश होता.
अतिरिक्त पोलीस महासंचालक एल. कैलुन यांनी दिलेल्या माहितीनुसार; या सर्व लोकांना न्यायालयामध्ये सादर करुन, त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड वसून करण्यात आला. यांमध्ये तौबल जिल्हा आघाडीवर होता. जिल्ह्यात एकूण २६३ लोकांना अटक करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.
तौबल जिल्हा पोलिसांनी मास्कबाबत जागरुकता वाढवण्यासाठी 'नो मास्क नो फ्युअल' ही पद्धत अवलंबली आहे. यामध्ये मास्क न घातला पेट्रोल पंपावर आल्यास, लोकांना पेट्रोल मिळणार नाही. यासोबतच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जागृती करण्यासाठीही पोलीस प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा : केरळमधील मंदिर उत्सवाचे एक आकर्षक लघुचित्र