नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच हरियाणामधील 92 वर्षीय आजीबाई चक्क शिलाई मशिनवर मास्क शिवताना पाहायला मिळाल्या आहेत.
विद्यावंती हौसले असे या आजीबाईंचे नाव आहे. शिलाई मशिनवर त्यांनी कपड्यपासून मास्क शिवले आहेत. हे मास्क गरिबांमध्ये वाटण्यात येत आहेत. त्यांची मशीनही तब्बल 72 वर्ष जूनी आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये त्यांनी अनेकांना मोफत मास्क वितरीत केले आहेत. तसेच त्यांनी लोकांना घरामध्ये थांबण्याचे आवाहन केले आहे. विद्यावंती यांचे कुटुंबीय हरियाणामधील करनाल येथील सदर बाजार भागात राहतात. त्यांचे पुत्र आरएसएस सेवा भारती शाखेचे अध्यक्ष आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे. त्यानुसार मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. घरच्याघरी कॉटनचं कापड, कातर आणि शिवणयंत्राच्या किंवा शिवणकामाच्या वस्तू अशा साध्या घरगुती साधनांच्या सहाय्याने मास्क तयार करता येतात