मुंबई - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत जगातील ९१ लाख ८५ हजार २२९ जणांना याची बाधा झाली आहे, तर ४ लाख ७४ हजार २३७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४९ लाख २१ हजार ६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
![Global COVID-19 tracker](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7733283_kkkk.jpg)
जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. या यादीत ब्राझील आणि रशियानंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो. अमेरिकेमध्ये २३ लाख ८८ हजार १५३ रुग्ण, ब्राझीलमध्ये ११ लाख ११ हजार ३४८ रुग्ण, तर रशियामध्ये ५ लाख ९२ हजार २८० रुग्ण आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाख ४० हजार २१५ वर आहे. जर अॅक्टिव्ह रुग्ण संख्येचा विचार केल्यास भारत या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
चीनच्या वुहान शहरात सुरुवातीला कोरोना वेगाने पसरला. त्यानंतर चीन शासनाने केलेल्या उपाययोजनेमुळे रुग्णांची संख्या आटोक्यात आली. पण आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. बिजिंगमधील १३ बाधितांसह नवे २२ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, चीनमध्ये सुरुवातीला पसरलेल्या कोरोनामुळे ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाल्याचे चीनने सांगितले.
भारताचा विचार केल्यास महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत महाराष्ट्रात ६ हजार २८३ मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३५ हजार ७९६ वर गेली आहे. यातील ६७ हजार ७०६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. नवी दिल्लीमध्ये ६२ हजार ६५५ कोरोना बाधित आहेत, तर २ हजार २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ३६ हजार ६०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा - हुतात्मा कर्नल संतोष बाबूंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा धनादेश...
हेही वाचा - J-K : पुलवामा चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवानाला वीरमरण