ETV Bharat / bharat

देशात दररोज बलात्कारांच्या ८७ घटनांची होते नोंद! - देशातील महिला अत्याचार आकडेवारी

एनसीआरबीने जारी केलेल्या एका आकडेवारीनुसार, २०१९मध्ये देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या तब्बल चार लाख पाच हजार ८६१ गुन्ह्यांची नोंद झाली. यापैकी ३२ हजार ३३ घटना बलात्काराच्या होत्या. म्हणजेच, २०१९मध्ये देशात दिवसाला सरासरी ८७ बलात्कारांची नोंद झाली...

87 daughters raped every day in the country and Uttar Pradesh tops in crime against women
देशात दररोज होते बलात्कारांच्या ८७ घटनांची नोंद!
author img

By

Published : Oct 2, 2020, 1:04 PM IST

नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी 'निर्भया' घटनेने देशाला हादरवले होते. तेव्हा लोकांनी महिला सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. त्यानंतर देशातील अशा घटनांना चाप बसेल, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संचलनालयाने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीने लोकांच्या या अपेक्षा फोल ठरवल्या आहेत.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०१९मध्ये देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या तब्बल चार लाख पाच हजार ८६१ गुन्ह्यांची नोंद झाली. यांपैकी ३२ हजार ३३ घटना बलात्काराच्या होत्या. म्हणजेच, २०१९मध्ये देशात दिवसाला सरासरी ८७ बलात्कारांची नोंद झाली. यापैकी तीन हजार ६५ गुन्हे हे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये घडले आहेत. उत्तर प्रदेश सरकार आणि तेथील पोलीस खाते किती 'सक्षमतेने' आपले काम करत आहेत, हे दाखवण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.

देशात दररोज होते बलात्कारांच्या ८७ घटनांची नोंद!

महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी..

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ५९ हजार ८५३ घटनांची नोंद झाली. तर, राजस्थानमध्ये ४१ हजार ५५० घटनांची नोंद झाली. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून, २०१९मध्ये राज्यात ३७ हजार १४४ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

राजस्थानमध्ये २०१९ साली सर्वाधिक पाच हजार ९९७ बलात्कारांच्या घटनांची नोंद झाली. तर, मध्य प्रदेशात दोन हजार ४८५ घटनांची नोंद झाली. गेल्या दोन-तीन दिवसांमध्येच राजस्थानमध्ये तब्बल १८ घटनांची नोंद झाली आहे.

ओळखीच्याच लोकांकडून होतात सर्वाधिक बलात्कार..

बलात्काराच्या ३०.९ टक्के घटनांमध्ये आरोपी हा पीडितेच्या ओळखीतील व्यक्तीच असल्याचे आढळले आहे. तसेच, २०१८च्या तुलनेत २०१९मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

कोरोना काळातही महिलांवरील अत्याचार सुरूच..

१ मार्च ते १८ सप्टेंबरदरम्यान बलात्कार आणि अल्पवयीन मुलांचे अश्लील चित्रीकरण (चाईल्ड पॉर्नोग्राफी) अशा प्रकारच्या १३ हजार २४४ घटनांची नोंद झाली आहे. केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी याबाबत माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.