कोलकाता – जगभरात कोरोनाचा उद्रेक होत असताना सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत 80 वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली आहे. ही महिला घरी बरी होवून परतल्याने शेजाऱ्यांनी तिचे जोरदार स्वागत केले आहे.
आजीबाईंच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी टाळ्या वाजवून घरी परतल्यानंतर स्वागत तेले. ही आजी स्थानिक लोकांसाठी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा ठरली आहे. मुंबईतही वयाची 100 वर्षे पूर्ण केलेल्या माजी शिक्षकाने कोरोनावर मात केली होती. त्यांचा वाढदिवस आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात साजरा केला होता.
देशात कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 68 हजार
देशात मंगळवारी 53 हजार 601 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. यामुळे देशातील रुग्णसंख्या 22 लाख 68 हजार 675 वर पोहोचली आहे. 15 लाख 83 हजार 490 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. देशभरात कोरोनामुळे 45 हजार 257 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 6 लाख 39 हजार 929 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली.