ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये बाहेरच्यांशी संपर्क आला नसतानाही आठ कैद्यांना कोरोना - inmates test COVID-19 +ve

आठही कैद्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून तुरुंगातील इतर कैद्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

कैद्यांना कोरोना
कैद्यांना कोरोना
author img

By

Published : Jun 5, 2020, 4:03 PM IST

गांधीनगर - गुजरातमधील साबरमती मध्यवर्ती कारागृहातील आठ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. एका कैद्याने जामीनावर घरी जाण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यामुळे आधी त्याची कोरोना चाचणी घेतली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे इतरही कैद्यांची चाचणी घेण्यात आली होती.

2019 साली खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या मनुभाई देसाई या कैद्याने जामीन मिळावा यासाठी अहमदाबाद उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. देसाई याची पत्नी आणि मुले अहमदाबादेतील कोरोना कन्टेंन्मेंट झोनमध्ये राहत असल्याचे मुलांची काळजी घेण्यासाठी कोणीही नसून पत्नी आजारी असल्याचे कारण देत जामीनासाठी अर्ज केला होता.

देसाई याची कोरोना चाचणी सकारात्मक आढळून आल्यानंतर तुरुंगातील इतर सहकार्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. तसेच संपूर्ण बराकीतील कैद्यांचीही चाचणी घेण्याचा निर्णय तरुंग प्रशासनाने घेतला.

आठही कैद्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून तुरुंगातील इतर कैद्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. पॅरोल किंवा जामिनावर घरी गेलेल्या कैद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या घटनेत कोणताही कैदी बाहेरून आलेला नव्हता किंवा कोणी बाहेर गेला नव्हता तरीही आठ जणांना कोरोनाची लागण झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.