जोधपूर (राजस्थान) - शहरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत जोधपूर शहरात कोरोनाचे 8 नवे रुग्ण आढळले आहे. यामध्ये आयसोलेशन वॉर्डात सेवा बजावणाऱ्या एका डॉक्टरचा समावेश आहे. या नव्या रुग्णांसह शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 51वर पोहोचली आहे.
रविवारी समोर आलेले हे नवे रुग्ण नागोरी गेट आणि त्याच्या परिसरातील आहे. या परिसरात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. नवीन नोंद होणारे बहुतांशी रुग्ण हे आधी सापडलेल्या रुग्णांचे नातेवाईक असून त्यांच्या संपर्कात आले आहे. दरम्यान, मथुरादास माथूर रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. याआधीही शहरात एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. तर, एका खासगी रुग्णालयात काम करणारे दोघे जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.
दरम्यान, रविवारी पाच रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, नवीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 40 जणांना मथुरादास माथूर रुग्णालयात आणण्यात आले आहे.