कोची - जगभरामध्ये कोरोना विषाणून थैमान घातले असून देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज केरळमधील 71 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णाला हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि किडनीचाही त्रास होता. केरळमधील हा कोरोनाचा दुसरा बळी आहे.
ताप आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. मात्र, प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना परियाराम महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली हे अद्याम समोर आले नाही. त्यांनी लग्नासह विविध कार्यक्रमामध्ये भाग घेत होता. मशिदीमध्येही गेले होते. तसेच वेगवेगळ्या वाहनातून प्रवास केला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या 16 जणांच्या कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे.
केरळमध्ये 364 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून 123 जण कोरोनामधून पूर्ण बरे झाले आहेत. तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १,०३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७,४४७ वर पोहोचली आहे. तर देशातील कोरोनाच्या बळींची संख्या २३९ वर पोहोचली आहे.राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत