लखनौ - आग्रा-लखनौ द्रुतगती महामार्गावर बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यात ७ जणांचा मृत्यू झाला, तर ३४ जण जखमी झाले आहेत. जिल्हा मॅजिस्ट्रेट प्रमोद कुमार उपाध्याय आणि पोलीस अधीक्षक अजय शंकर राय यांनी घटनास्थाळी धाव घेतली आहे. सर्व जखमींना सैफई वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
अपघातातील व्होल्वो बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशिरा हा अपघात घडला.