ETV Bharat / bharat

सिलेंडरच्या स्फोटात कोसळली इमारत; 12 ठार, तर 20 जण जखमी

मध्यप्रदेश राज्यातील मोहम्मदाबाद येथे सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. यात दुमजली इमारत कोसळून त्यात 12 ठार तर 20 जखमी झाले. यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सिलेंडरच्या स्फोटात 7 ठार तर 15 जण जखमी
author img

By

Published : Oct 14, 2019, 9:09 AM IST

Updated : Oct 14, 2019, 12:22 PM IST

महू - मध्यप्रदेश राज्यातील मोहम्मदाबाद गोहना कोतवाली परिसरातील वालिदपूर या गावात आज सकाळी गॅस सिलेंडरचा शक्तिशाली स्फोट झाला. यात दोन मजली इमारत कोसळली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि मदत पथक पोहचले आहे.

सिलेंडरच्या स्फोटात कोसळली इमारत; 12 ठार, तर 20 जण जखमी

हेही वाचा- मी संवेदनशिल माणूस, मंदीबद्दलच्या वक्तव्यावरून रविशंकर प्रसादांचे घुमजाव

घरगुती स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या सिलेंडरचा मोहम्मदाबाद गोहना कोतवाली परिसरातील वालिदपूर या गावात भीषण स्फोट झाला आहे. नेमका स्फोट कशाने झाला अद्याप समोर आले नाही. मात्र, स्फोट इतका मोठा होता की, त्याच्या हादऱ्याने दुमजली इमारत कोसळली आहे. समोर आलेल्या माहीतीनुसार त्यात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्फोटानंतर परिसरातील नागरीकांनी बचाव मोहीम होती घेतली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेनंतर घरगुती सिलेंडरच्या स्फोटाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

नाश्ता बनवताना झाला स्फोट
वालिदपूर गावात राहणारी गीता ही महिला सकाळी नाश्ता बनवित होती. याच दरम्यान अचानक एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की, संपूर्ण दुमजली इमारत कोसळली. यासह या इमारतीच्या शेजारीच असलेल्या कन्हैया विश्वकर्मा यांच्या घराला देखील तडे गेले आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 14, 2019, 12:22 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.