ETV Bharat / bharat

औरैया अपघातप्रकरणी 7 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन, 26 जण झाले होते ठार - औरेया अपघात न्यूज

उत्तर प्रदेशमधील औरैया अपघाताप्रकरणी 7 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. औरैया पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली.

accident-case
accident-case
author img

By

Published : May 18, 2020, 8:27 AM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातील मिहौली भागात शनिवारी भीषण रस्ता अपघातामध्ये 26 कामगार ठार झाले होते. याप्रकरणी संबधित परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका उपनिरीक्षकासह 7 पोलीस कर्मचाऱ्यांना औरैया पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले.

अजितमल कोतवाली परिसरातील एनएच -२ वरील अनंत राम टोल प्लाझा येथे कर्तव्यावर असलेल्या उपनिरीक्षक रामजीत सिंह , कॉन्स्टेबल पुनूलाल, शिवपाल, विजय सिंग, प्रवीण कुमार, शेखर सिद्धार्थ, अंशु यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश दीक्षित करीत होते.

7-constables-suspended-including-sub-inspector-in-auraiya-road-accident-case
औरैया अपघाताप्रकरणी 7 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

दिल्ली येथून येत असलेल्या डीसीएम व्हॅनची ट्रकला जोरदार धडक बसली होती. ट्रक जवळपास 50 प्रवासी मजूर घेऊन राजस्थानातून येत होता. ट्रकमधील बहुतांश स्थलांतरित हे मूळचे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.