नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे हजारो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्यात येत आहे. गेल्या चार दिवसात हरियाणा सरकारने तब्बल 68 हजार स्थलांतरितांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवले आहे.
कामगारांना त्याच्या राज्यात सुरक्षित आणि पद्धतशीरपणे पोचण्यासाठी 5 हजार बसेस आणि १०० 'विशेष श्रमिक रेल्वे' ची व्यस्था करण्यात आली. अशी माहिती एका अधिकृत निवेदनाद्वारे रविवारी देण्यात आली.
परप्रांतीय कामगारांना घेऊन जाणाऱया १ हजार १०० हून अधिक बसेस उत्तर प्रदेशात 890, राजस्थानसाठी 152, मध्य प्रदेशमध्ये 44, पंजाब आणि उत्तराखंडला प्रत्येकी 9 तर हिमाचलला 2, अशा बसेस पाठविण्यात आल्या आहेत. तसेच, देशाच्या विविध भागात अडकलेल्या सुमारे 10 हजार हरियानातील रहिवाशांना राज्यात परत आणण्यात आले आहे
दरम्यान लॉकडाऊन सुरू होऊन बरेच दिवस झाले. परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ राज्यात परतायला सुरुवात करत आहेत. लॉकडाऊनमुळे मजुरांची गैरसोय होत आहे. हातावर पोट असलेले हे मजुर आपल्या घराचं ओढीनं मैलोनमैल प्रवास करत आहेत.