आगरतळा - त्रिपुरामध्ये एका सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका तीस वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, जिचा खून झाला ती चिमुरडी आरोपीच्या मुलीची मैत्रीण होती, अशी माहिती मिळत आहे.
काचकला त्रिपुरा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोमती जिल्ह्यातील घोरकप्पा गावामध्ये ही घटना झाली आहे. आरोपीची मुलगी आणि पीडिता बागेमध्ये खेळत असताना, आरोपीने पीडितेला उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार करून, त्याने तिचा खून केला.
"आपण तिचा गळा दाबून खून केला, त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात टाकून दिला," अशी कबुली आरोपीने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : मध्यप्रदेशच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील 'नसबंदी'चे संकट टळले